Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशCovid-19 : देशातील रुग्णसंख्या पुन्हा वाढली

Covid-19 : देशातील रुग्णसंख्या पुन्हा वाढली

दिल्ली | Delhi

ऑगस्टनंतर सोमवारी पहिल्यांदाच २४ कमी रुग्ण आढळून आले. मात्र, हा दिलासा २४ तासांपुरताच राहिला. गेल्या २४ तासात देशात ७२ हजाराच्यावर रूग्ण आढळून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,

- Advertisement -

गेल्या २४ तासात ९८६ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासात ७२ हजार ०४९ रूग्ण आढळले आहे. देशातील एकूण करोना बाधितांची संख्या ६७ लाख ५७ हजार १३२ इतकी झाली आहे. त्यातील आजपर्यंत ५७ लाख ४४ हजार ६९४ रूग्ण करोनामुक्त झाले असून ९ लाख ७ हजार ८८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आजपर्यंत १ लाख ०४ हजार ५५५ रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांच्या एकूण आकडेवारीपैकी ७७ टक्के रुग्ण हे अवघ्या १० राज्यांमध्ये आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तमिलनाडू, उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी ही माहिती मंगळवारी दिली. राजेश भूषण यांनी माहिती देताना सांगितले की, गेल्या दोन आठवड्यांमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या १० लाखांहून कमी राहिली आहे. देशातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सद्यास्थितीत करोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ८४ टक्के इतका आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या