Friday, April 4, 2025
Homeदेश विदेशCovid-19 : देशातील रुग्णसंख्या ९३ लाखांच्या पुढे

Covid-19 : देशातील रुग्णसंख्या ९३ लाखांच्या पुढे

दिल्ली | Delhi

देशात पुन्हा एकदा करोनाचा प्रसार वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस आकडेवारीत वाढ होत असून, गेल्या २४ तासांत देशात ४३ हजारांहून अधिक करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,

- Advertisement -

गेल्या २४ तासांमध्ये देशात ४३ हजार ०८२ नवे करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय ४९२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. देशातील एकूण करोना बाधितांची संख्या आता ९३ लाख ०९ हजार ७८८ वर पोहचली आहे. सद्यस्थितीस देशात ४ लाख ५५ हजार ५५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ८७ लाख १८ हजार ५१७ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. याशिवाय देशभरात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ लाख ३५ हजार ७१५ झाली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती

राज्यात काल ४ हजार ८१५ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे, राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख ६८ हजार ५३८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे सांगितले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५७ % एवढे झाले आहे.

दरम्यान, राज्यात काल ६ हजार ४०६ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. राज्यात आज ६५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६ % एवढा आहे. कालपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ०५ लाख ४७ हजार ३३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ०२ हजार ३६५ (१७.०९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख २८ हजार ६९० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६ हजार ६३४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

‘एमआयडीसी’ असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याचे धोरण करावे -मुख्यमंत्री देवेंद्र...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) वसाहत असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास या भागातील विकास करता येईल. त्यामुळे अशा गावांना औद्योगिक...