Saturday, May 18, 2024
Homeदेश विदेशदेशात लसीकरणाचा 40 कोटींचा टप्पा पार

देशात लसीकरणाचा 40 कोटींचा टप्पा पार

नवी दिल्ली / New Delhi – देशातील करोना लसीकरणाने (covid-19 vaccination) 40 कोटींचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत 40 कोटींहून अधिक करोना प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. शनिवारी 7 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार 40 कोटी 44 लाख 67 हजार 526 जणांनी लस घेतली. तर शनिवारी दिवसभरात 46 लाख 38 हजार 106 जणांना लस देण्यात आली आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात आली होती.

आरोग्य कर्मचार्‍यांपैकी पहिला डोस घेतलेल्यांची संख्या 1 कोटी 2 लाख 68 हजार 882 इतकी आहे तर 75 लाख 38 हजार 877 जणांना दोन्ही डोस घेतले आहेत. फ्रंट लाइन वर्कर्समध्ये 1 कोटी 77 लाख 91 हजार 635 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस 1 कोटी 3 लाख 41 हजार 848 जणांनी घेतला आहे. लसीकरण मोहिम तीन वयोगटात टप्प्या टप्प्याने सुरु करण्यात आली होती.

- Advertisement -

यामध्ये 60 वर्षांवरील नागरिकांमध्ये 7 कोटी 20 लाख 61 हजार 327 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 3 कोटी 11 लाख 75 हजार 952 जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. 45 वर्षांवरील 9 कोटी 74 लाख 18 हजार 789 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस 2 कोटी 90 लाख 12 हजार 289 जणांनी घेतला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या