Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशCOVID19 : युरोपला पुन्हा करोनाचा विळखा, भारतातील स्थिती काय?

COVID19 : युरोपला पुन्हा करोनाचा विळखा, भारतातील स्थिती काय?

दिल्ली | Delhi

जवळपास गेल्या दोन वर्षांपासून करोना महामारीनं (corona epidemic) जगभरात धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत कोट्यवधी लोकांना करोनाची लागण (coronavirus) होऊन गेली आहे. त्यातील काहींना करोनावर मात करणं शक्य झालं तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे.

- Advertisement -

दरम्यान मध्यंतरी करोनाचा प्रभाव काहीसा कमी झाला. तेव्हा जगभरातील विविध देशांनी आपल्या करोना परिस्थितीचा आढावा घेऊन कोविड निर्बंध हटवले होते. आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर होतं. मात्र, आता पुन्हा काही देशांमध्ये करोना महामारीनं डोकं वर काढल्याचं चित्र दिसत आहे.

युरोप पुन्हा करोनाचा महामारीचा केंद्रबिंदू बनला आहे. जगातल्या रुग्णसंख्येच्या जवळपास निम्मी रुग्णसंख्या तसंच मृत्यू युरोपतले आहेत. संक्रमणाच्या चौथ्या लाटेने युरोपची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीला राष्ट्रीय आपत्कालीन स्थितीत आणले आहे. आरोग्य मंत्री जेन्स स्पॅन यांनी इशारा दिला आहे की केवळ लसीकरणाने प्रकरणांची संख्या कमी होणार नाही.

ऑस्ट्रिया करोना विषाणूच्या नवीन लाटेला तोंड देण्यासाठी लॉकडाउन पूर्णपणे पुन्हा लादणार आहे. ऑस्ट्रिया हे असे करणारा पश्चिम युरोपमधील पहिला देश बनेल. यासोबतच सरकारने सांगितले की, फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करणे आवश्यक आहे. ऑस्ट्रियाने सोमवारी लसीकरण न केलेल्या सर्व लोकांसाठी लॉकडाउन सुरू केले, परंतु तेव्हापासून संसर्गाने नवीन विक्रम गाठले आहेत.

दरम्यान, भारतात आता करोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. भारतात मागील २४ तासांत १० हजार ३०२ नव्या करोना रुग्णांची आणि २६७ मृत्यूची नोंद झाली. याच काळात देशातील करोना रुग्णांपैकी ११ हजार ७८७ जण बरे झाले. देशात १ लाख २४ हजार ८६८ सक्रिय रुग्ण आहेत. ही ५३१ दिवसांतील सर्वात कमी सक्रिय रुग्णसंख्या आहे.

तसेच मागील २४ तासांत भारतात आढळलेल्या १० हजार ३०२ नव्या करोना रुग्णांपैकी ५ हजार ७५४ जण केरळमधील आहेत. तसेच देशात २४ तासांत झालेल्या २६७ करोना मृत्यू पैकी ४९ केरळमधील आहेत. भारतात आतापर्यंत आढळलेल्या ३ कोटी ४४ लाख ९९ हजार ९२५ करोना रुग्णांपैकी ३ कोटी ३९ लाख ९ हजार ७०८ जण बरे झाले. करोनामुळे देशात ४ लाख ६५ हजार ३४९ मृत्यू झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या