Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशCOVID19 : देशात दैनंदिन रुग्णसंख्येत घट, पण Omicron बाधितांमध्ये ८ टक्क्यांनी वाढ;...

COVID19 : देशात दैनंदिन रुग्णसंख्येत घट, पण Omicron बाधितांमध्ये ८ टक्क्यांनी वाढ; वाचा आजची आकडेवारी

दिल्ली | Delhi

करोनाच्या (corona update) डेल्टा (delta) आणि ओमिक्रॉन (omicron) व्हेरियंटमुळे देशात तिसऱ्या लाटेचा (corona third wave) उद्रेक झाला असून, दररोज लाखो नागरिक कोविड पॉझिटिव्ह आढळून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात अडीच लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत होती. मात्र, गेल्या चोवीस तासात करोनाच्या रुग्णांमध्ये घट झाल्याचं दिसून आलं आहे.

- Advertisement -

PHOTO : अल्लू अर्जुनची रियल लाईफ ‘श्रीवल्ली’ पाहिलीत का?

देशात गेल्या २४ तासात करोनाचे २ लाख ३८ हजार ०१८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत आणि भारतात गेल्या २४ तासात १ लाख ५७ हजार ४२१ बरे झाले आहेत. तर, ३१० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाच्या नवीन रुग्णांसह देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता १७ लाख ३६ हजार ६२८ वर पोहोचली आहे.

PHOTO : मुकेश अंबानींकडून अलिशान हॉटेलची खरेदी; तब्बल ७३५ कोटींची गुंतवणूक

करोनामुळे आतापर्यंत ४ लाख ८६ हजार ७६१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर देशातील ओमायक्रॉन बाधितांची एकूण रुग्णांची संख्या ८ हजार ८९१ इतकी झाली आहे. भारतात लसीकरण मोहीम वेगाने चालविली जात आहे. आतापर्यंत १५७ कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत.

PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

- Advertisment -

ताज्या बातम्या