Saturday, May 4, 2024
HomeनगरCOVID19 : नगरला मागे टाकत संगमनेर, अकोले, पाथर्डी, पारनेर टॉपवर

COVID19 : नगरला मागे टाकत संगमनेर, अकोले, पाथर्डी, पारनेर टॉपवर

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना बाधितांच्या संख्येत दोन दिवसांपासून काहीसा दिलासा मिळण्यास सुरूवात झाली आहे. बाधितांची संख्या 3 हजारांच्या टप्प्यात खाली आणण्यात यश आले असले तरी नगर शहराला मागे टाकत संगमनेर, अकोले, पाथर्डी आणि पारनेर आता आघाडीवर आले आहे. दरम्यान उपचार सुरू असणार्‍यांची संख्या अद्याप 27 हजारांच्या पुढे आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात काल 3 हजार 936 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोना मुक्त झालेल्यांची संख्या 1 लाख 87 हजार 107 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण 86.40 टक्के झाले आहे. काल नव्याने 3 हजार 184 ने करोना रुग्ण वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 27 हजार 86 आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 1 हजार 348, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1 हजार 94 आणि अँटीजेन चाचणीत 742 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 10, अकोले 240, जामखेड 108, कर्जत 168, कोपरगाव 48, नगर ग्रामीण 54, नेवासा 41, पारनेर 74, पाथर्डी 90, राहाता 52, राहुरी 45, संगमनेर 273, शेवगाव 29, श्रीगोंदा 60, श्रीरामपूर 15, कँटोन्मेंट बोर्ड 25, मिलिटरी हॉस्पिटल 1 आणि इतर जिल्हा 15 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 152, अकोले 16, जामखेड 17, कर्जत 18, कोपरगाव 19, नगर ग्रामीण 127, नेवासा 130, पारनेर 85, पाथर्डी 75, राहाता 63, राहुरी 49, संगमनेर 62, शेवगाव 102, श्रीगोंदा 34, श्रीरामपूर 107, कँटोन्मेंट बोर्ड 9, इतर जिल्हा 28 आणि इतर राज्य 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत 742 जण बाधित आढळुन आले. मनपा 33, अकोले 20, जामखेड 4, कर्जत 39, कोपरगाव 68, नगर ग्रामीण 58, नेवासा 38, पारनेर 87, पाथर्डी 104, राहाता 40, राहुरी 102, संगमनेर 26, शेवगाव 38, श्रीगोंदा 18, श्रीरामपूर 61 आणि इतर जिल्हा 6 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान सोमवारी करोना बळींची संख्या 2 हजार 338 होती. त्यात मंगळवारी 27 ची वाढ होवून करोनामुळे मृतांची संख्या आता 2 हजार 365 झाली आहे.

संगमनेर 361, अकोले 276, पाथर्डी 269, पारनेर 246, नगर ग्रामीण 239, कर्जत 225, नेवासा 209, राहुरी 196, नगर मनपा 195, श्रीरामपूर 183, शेवगाव 169, राहाता 155, कोपरगाव 135, जामखेड 129, श्रीगोंदा 112, अन्य जिल्हा 49, भिंगार 34, लष्कर रुग्णालय 1 अन्य राज्य 1 असे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या