Thursday, September 19, 2024
Homeदेश विदेशCOVID19 : भारतात रिकव्हरी रेट ९६.८० टक्क्यांवर; मृतांची संख्या हजाराच्या आत

COVID19 : भारतात रिकव्हरी रेट ९६.८० टक्क्यांवर; मृतांची संख्या हजाराच्या आत

दिल्ली | Delhi

- Advertisement -

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेना देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान देशातील नव्या करोना रुग्णांची संख्या घटत असल्याने करोनाची दुसरी लाट आता बर्‍यापैकी नियंत्रणात आली आहे.

मात्र नव्याने आढळलेल्या डेल्टा प्लस करोनाच्या नवीन प्रकारामुळे चिंतेचे वातावरण आहे. डेल्टा प्लसमुळे तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,देशात गेल्या २४

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,देशात गेल्या २४ तासांत ४६ हजार १४८ नवे करोना रुग्ण आढळले असून ९७९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णसंख्या ३ कोटी ०२ लाख ७९ हजार ३३१ इतकी झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,देशात गेल्या २४ तासांत ४६ हजार १४८ नवे करोना रुग्ण आढळले असून ९७९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णसंख्या ३ कोटी ०२ लाख ७९ हजार ३३१ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ लाख ९६ हजार ७३० वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात ५८ हजार ५७८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी ९३ लाख ०९ हजार ६०७ वर पोहचली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या