Tuesday, May 28, 2024
Homeनगरआरटीपीसीआरची गती... 450 दिवसात 5 लाख

आरटीपीसीआरची गती… 450 दिवसात 5 लाख

अहमदनगर | प्रतिनिधी

जिल्हा रुग्णालयातील (District Hospital) करोना तपासणी प्रयोगशाळा (लॅब) सुरू झाल्यापासून 450 दिवसांत 5 लाख आरटीपीसीआर (RT-PCR Test) तपासण्यांचा टप्पा पूर्ण झाला आहे. या प्रयोगशाळेत दररोज 3000 चाचण्या होत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनील पोखरणा (Dr. Sunil Pokhrana) यांनी दिली. या लॅबमध्ये 22 मे 2020 रोजी नगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) पहिली चाचणी झाली होती.

- Advertisement -

चकाचक निवारा पुन्हा हाती

भारतात नोव्हेंबर 2019 मध्ये करोनाचा (COVID19) शिरकाव झाला. त्यानंतर काही महिन्यातच, मार्च 2020 मध्ये नगरमध्ये करोनाचा पहिला बाधित सापडला. राज्यात ज्या जिल्ह्यात सर्वात आधी करोनाचा शिरकाव झाला, त्या जिल्ह्यात नगरचा समावेश होता. करोनाच्या या अनाहूत हल्ल्यामुळे आरोग्य यंत्रणेसह नागरिकही चिंतेत पडले होते. करोना निदान आणि उपचार अशा दोन्ही आघाड्यांवर अस्पष्टता होते. करोना निदानासाठी नमुने पुणे (Pune) येथील प्रयोगशाळेत पाठवले जायचे. अहवालासाठी 3 ते 4 दिवस लागायचे. या काळात करोना (Coronavirus) प्रसाराचा धोका अधिकच असायचा. करोना प्रसार वेगाने झाल्यामुळे चाचण्यांचा वेग वाढविण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

22 मे 2020 रोजी जिल्हा रुग्णालयात नगर जिल्ह्यातील पहिली आरटीपीसीआर लॅब (RTPCR Lab) चालू झाली. त्यानंतर चाचण्यांचा वेग वाढला व अहवाल हाती येण्याचा काळही घटला. त्यास आता 450 दिवस उलटले आहेत. या काळात एकही दिवसाची सुट्टी न घेता दिवस रात्र ही लॅब कार्यरत आहे. डॉ.पोखरणा यांच्यासह अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.वसंत जमदाडे, डॉ. सुवर्णामाला बांगर, डॉ.भूषणकुमार रामटेके, डॉ. महावीर कटारीया, डॉ.मनोज घुगे, डॉ नरेंद्र पाटील, डॉ. साहिल शेख, डॉ. विक्रम पानसंबळ, डॉ. प्रताप साळवे, डॉ. चेतना जोशी यांच्यासह लॅब तंत्रज्ञ, लॅब सहायक, डेटा एन्ट्री टीम, सपोर्ट स्टाफ परीश्रम घेत आहे.

सध्या आपल्याकडे तीन मशीन आहेत. 450 दिवसांमध्ये तब्बल 5 लाख आरटीपीसीआर चाचण्या सामुहिक कामगिरीमुळे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पूर्ण करू शकलो. जिल्ह्यातील रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी जिल्हा रूग्णालयात होत आहे.

-डॉ.सुनील पोखरणा

आमच्या कामात अजून वेग आणि सुसूत्रता आणण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत. वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि आमच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच आम्ही हे साध्य करू शकलो.

-डॉ. नरेंद्र पाटील

- Advertisment -

ताज्या बातम्या