Saturday, July 27, 2024
HomeनाशिकNashik : बिबट्याच्या हल्ल्यात गायीचा मृत्यू

Nashik : बिबट्याच्या हल्ल्यात गायीचा मृत्यू

दहिवड | प्रतिनिधी | Dahiwad

येथे आज (दि.२२ जुलै) रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) गायीचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. यात शेतकऱ्याचे (Farmer) हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे…

- Advertisement -

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांची संख्या २२ वर; १०० हून अधिक लोकांची ओळख पटली

याबाबत अधिक माहिती अशी की, आज पहाटेच्या सुमारास दहीवड (Dahiwad) येथील सिंदओहळ शिवारातील शेतकरी बापू तानाजी भारती यांच्या घराजवळील शेत गट नंबर ५१३/ ब/ ५/२ मध्ये बांधलेल्या गायवर बिबट्याने हल्ला केला. त्यानंतर ७० ते ८० फुट गाईला (Cow) ओढत नेत तिच्यावर जबर हल्ला करून तिला ठार केले. त्यामुळे शेतकरी भारती यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले.

“मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री…”; आमदार अमोल मिटकरींचे सूचक ट्वीट

दरम्यान, या घटनेबाबत देवळा वनविभागला (Deola Forest Department) कळविण्यात आले असून वनविभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी. तसेच बिबट्याचा (Leopard) बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या