धुळे ।dhule । प्रतिनिधी
तालुक्यातील नेर गावाजवळ एका पिकअप वाहनातून (pickup vehicle) होत असलेली गोवंशाची अवैध (illegal transportation of cattle) वाहतूक गोरक्षकांनी (Cow guards) उघड केली. या कारवाईत धुळे तालुका पोलिसांनी 1 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
सभापती राष्ट्रवादीचा की ठाकरे गटाचा?
एम. एच. 01/ एल.ए. 3354 या पिकअप वाहनातून गोवंशाची वाहतूक होत असल्याची माहिती गोरक्षक ज्ञानेश्वर कचवे, ऋषिकेश पाटील, विशाल पाटील, प्रणिल मंडलिक, कुणाल घाटोळे, विक्की वाघ, सर्व रा.धुळे यांना मिळाली. त्यानुसार या गोरक्षकांनी नेर गावाच्या पुढे असलेल्या पांझरा नदीच्या पुलाजवळ पाळत ठेवली.
VISUAL STORY : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा हा लुक पाहाल तर… काळीज होईल खल्लास…भाजपात दोन ग्रामीण जिल्हाध्यक्ष नेमले जाणार!
या रस्त्यावर संशयित वाहन येतांना गोरक्षकांना दिसले. त्यास थांबण्याचा इशारा केला असता वाहन चालकाने सुसाट वेगात वाहन पुढे नेले. यानंतर वाहन डिव्हायडरला धडकले.अपघातानंतर तिघे गोतस्कर अंधाराचा फायद घेवून पसार झाले. घटनास्थळी असलेल्या गोरक्षकांनी धुळे तालुका पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. धुळे तालुका पोलिसांनी घटनास्थळावर येवून वाहनाची तपासणी केली असता या वाहनात तीन हजार रूपये किंमतीचा खिल्लारी जातीचा गोर्हा, 17 हजार रूपये किंमतीचे सात वासरू अत्यंत निर्दयतेने बांधलेल्या अवस्थेत आढळून आले.
नवापूर तालुक्यातील रस्त्यांच्या कामांमध्ये अपहार
या कारवाईत एक लाख रूपये किंमतीची पिकअप वाहन, 3 हजार रूपये किंमतीचा खिल्लारी जातीचा गोर्हा आणि 17 हजार रूपये किंमतीचे सात वासरु असा एकूण एक लाख 20 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोकॉ. विनायक खैरनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्य नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. बोरसे हे करीत आहेत.
मोबाईलवरुन पटली रेल्वेतून पडलेल्या मयताची ओळख