Tuesday, September 17, 2024
Homeब्रेकिंग न्यूजविधानसभा निवडणूकीत माकपाने केला 'इतक्या' जागा लढविण्याचा निर्धार; वाचा सविस्तर

विधानसभा निवडणूकीत माकपाने केला ‘इतक्या’ जागा लढविण्याचा निर्धार; वाचा सविस्तर

- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आज भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)च्या वतीने शहरातील पक्ष सभासदांची सर्वसाधारण सभा सीटू कामगार भवन येथे पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ.उदय नारकर, कॉ.जीवा पांडू गावित, कॉ.भिका राठोड, कॉ.डॉ.डी. एल.कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.

यावेळी विधानसभा निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका? याविषयी कॉ. उदय नारकर यांनी मार्गदर्शन केले.त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारी संदर्भात कॉ जे पी गावित यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर दुपारी प्रभाग निहाय गट चर्चा व गट चर्चेचे सादरीकरण सभासद, पदाधिकार्‍यांनी केले.

यावेळी आगामी निवडणूकीत नाशिक पश्चिममधून डॉ.डी.एल.कराड यांनी विधानसभा निवडणुकीच्या नियोजनास अंतिम रूपरेषेचे माध्यमातून समारोप केला.या सर्वसाधारण सभेस कॉ. सिताराम ठोंबरे, अ‍ॅड. वसुधा कराड, अ‍ॅड.तानाजी जायभावे, कॉ.सचिन भोर, कॉ.दगडू व्हडगर, कॉ. सिंधू शार्दुल,कॉ.तुकाराम सोनजे, प्रा.मिलिंद वाघ, कॉ.संतोष काकडे आदींसह पक्ष सभासद मोठ्या संख्येने सहभागी होते.

महाविकास आघाडीच्या वरिष्ट नेत्यांसोबत माकपाच्या पदाधिकार्‍यांची बैठक पार पडलेली असून, लोकसभेप्रमाणेच आगामी विधान सभेच्या निवडणूकीतही माकपा महाविकास आघाडीसोबत काम करण्यार असल्याची ग्वाही देण्यात आली. निवडणूकीत माकपाचे प्राबल्य असलेल्या राज्यातील १२ जागा लढवण्याचा निर्धार माकपाने या बैठकीत व्यक्त केला असून त्यास शरद पवार, उध्दव ठाकरे व नाना पटोले यांनी तत्वत: मान्यता दिली असल्याचे माकपाचे प्रदेश सेक्रेटरी कॉ. उदय नारकर यांनी या वेळी सांगितले.माकपाचे प्राबल्य असलेल्या नाशिक जिल्हातील दिंडोरी, कळवण व नाशिक पश्चिम या जागांची मागणी केलेली आहे.

राज्यात सत्तांतर घडवण्यासाठी मविआची वज्रमुठ
राज्यात महायुतीच्या सरकारने जसामान्यांना देऊ केलेल्या योजना हा निवडणूक स्टंट असून त्या योजना दिर्घकाळ चालू शकणार नाहीत. सूरु असलेला कारभार हा राज्याच्या हिताचा नाही.त्यामुळे लोकसभेप्रमारेच सत्ताधार्‍यांना जनता मोठा जटका देणार असून या विरोधात मविआची वज्रमुठ एक दिलाने काम करणार असल्याचे प्रतिपादन सिटूचे प्रदेशाध्यक्ष डॉ. डी.एल.कराड यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या