Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजओडिशात 'इंडिया वन एअर'च्या विमानाचा भीषण अपघात; पायलटसह ६ जण जखमी

ओडिशात ‘इंडिया वन एअर’च्या विमानाचा भीषण अपघात; पायलटसह ६ जण जखमी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
ओडिशामध्ये शनिवारी दुपारी भुवनेश्वरहून राउरकेला येथे जाणाऱ्या ‘इंडिया वन एअर’च्या ९ सीटर विमानाचा लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. राउरकेला येथील रघुनाथपल्ली परिसरातील झुला ए ब्लॉकजवळ हे विमान कोसळले.

मिळालेल्या माहितीनुसार मोठी दुर्घटना टळली आहे. विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले. इंडिया वन एअरलाइन्सच्या विमानाने दुपारी 1:30 वाजता काटीबंधा कंसाराजवळील एका शेतात आपत्कालीन लँडिंग केले. चार प्रवासी आणि दोन पायलट असलेले सिंगल-इंजिन विमान सुमारे चार ते पाच किलोमीटर उड्डाण केल्यानंतर तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे पायलटला विमान क्रॅश-लँडिंग करावे लागले. हे विमान राउरकेलाच्या रघुनाथपल्ली परिसरातील जल्दा ‘ए’ ब्लॉकजवळ कोसळलं.

- Advertisement -

मोठी बातमी! टीकेची झोड उठल्यानंतर तुषार आपटेंनी स्विकृत नगरसेवकपदाचा दिला राजीनामा

YouTube video player

घटनेची माहिती मिळताच राउरकेला आणि पानपोश अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सुंदरगड जिल्ह्यातील कंसार येथे विमान कोसळल्यानंतर काही प्रवासी आत अडकले होते, त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेनंतर अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. विमान राउरकेलाहून भुवनेश्वरला जात असताना ही घटना घडली. ओडिशाचे वाणिज्य आणि वाहतूक मंत्री बी.बी. जेना यांनी सांगितले की, ए-1 श्रेणीतील खासगी विमान अपघातात कोसळले. त्यात पायलटसह सहा जण होते. सर्व जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. डीजीसीएला घटनेची माहिती देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

जिल्हा परिषद, पंचायत समितीत स्वीकृत सदस्य?

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai महापालिका आणि नगरपालिकांप्रमाणेच आता जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्येही 'स्वीकृत सदस्य' नियुक्त केली जाण्याची शक्यता आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री...