Monday, May 19, 2025
Homeधुळेएक गाव एक गणपती स्थापन करुन आदर्श निर्माण करा-पो.अ.प्रवीणकुमार पाटील

एक गाव एक गणपती स्थापन करुन आदर्श निर्माण करा-पो.अ.प्रवीणकुमार पाटील

धुळे – प्रतिनिधी dhule

- Advertisement -

सामाजिक एकोपा राखण्यासाठी एक गाव एक गणपती स्थापन करुन शिरपुर तालुक्यात एक आदर्श निर्माण करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील (Superintendent of Police Praveen Kumar Patil) यांनी केले. आगामी गणेशोत्सवाबाबत (Ganeshotsav) पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी शिरपुर तालुका पोलीस ठाण्याला काल भेट दिली.

भेटी दरम्यान त्यांनी पोलीस ठाणे हद्दीतील गणेश मंडळाचे पदाधिकारी, पोलीस पाटील, प्रतिष्ठीत व्यक्ती, माजी पंचायत समिती सभापती जगन टेलर, रमन भाऊसाहेब, वसंत पावरा, आदी उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील मार्गदर्शन करतांना पुढे सांगितले की, मागील दोन-तीन वर्षापासून कोरानामुळे सार्वजनिक उत्साव साजरे करण्यासाठी बंदी होती. परंतु यावेळी शासनाने सार्वजनीक उत्सवावरचे सर्व सण कोणत्याही निरबंधनाशिवाय साजरे करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे नागरीकांसह कार्यकर्त्यामध्ये उत्सावाचे वातावरण पसरलेले आहे. लवकरच सर्वांचा जिवाभावाचा उत्सव म्हणजेच गणपतीचे आगमन होणार आहे.

गणपती स्थापने पुर्वी पोलीस (police) परवाना घेणे बंधन कारक असणार आहे. त्यासाठी एक खिडकी योजनेर्तगत परवाना काढण्याची मोहीम सुरू केलेली आहे. मंडळांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

तसेच वर्गणी सक्तीने व वाहने अडवून जमा न करण्याबाबत सुचना दिल्या. जमलेल्या वर्गनीचे सामाजिक उपक्रम राबवुन आपल्या मंडळाचे व गावाचे नाव मोठे होईल याबाबत प्रयत्न

करावा. त्यानतंर महत्वाचे मंडप हा वाटरप्रुफ व गणपती स्थापनेचे आसन मजबूत असावे, जेणे करून श्री मुर्तीचे पाऊस व आगी पासून संरक्षण होईल. गणेशोत्सव साजरा करतांना ध्वनीक्षेपनाचा वापर सर्वोच्च न्यायालयाने

ठरवून दिलेल्या अटी नुसार असावा. मंडपामध्ये अथवा किंवा इतरत्र अनोळखी संशयीत, वस्तु किंवा व्यकती आढळल्यास तातडीने पोलीसांना माहिती दयावी. गणेश विसर्जन मिरवणुक विहित वेळेत संपवावी तसेच पारंपारीक वाद्यांचा वापर करावा. जेणे करुन ध्वनी प्रदुषण होणार नाही.

उत्सव देवाचे पावित्र राखून साजरा करावा, असेही सांगत सर्व गणेश भक्तांना गणपती उत्सावाच्या शुभेच्छा दिल्या. बैठकीत शिरपुर विभागाचे प्रभारी डीवायएसपी दिनेश आहेर यांनी देखील मार्गदर्शन केले. शिरपुर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सुरेश शिरसाठ यांनी शिरपुर तालुका पोलीस ठाणे हद्दीत साजरा होणाऱ्या गणपती उत्सवाबाबत प्रास्ताविक केले. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन पोसई भिकाजी पाटील यांनी केले. आभार पोसई संदीप पाटील यांनी मानले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi : देशाने आपली संरक्षण सिद्धता जगाला दाखवून दिली – पालकमंत्री...

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi पहलगामच्या हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली देशाने आपली संरक्षण सिध्दता जगाला दाखवून देतानाच आत्मनिर्भर भारताचे दर्शनही...