Sunday, September 15, 2024
Homeनाशिकक्लीन, ग्रीन, हेल्दी सिटीसाठी क्रेडाई कटिबद्ध

क्लीन, ग्रीन, हेल्दी सिटीसाठी क्रेडाई कटिबद्ध

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

क्रेडाई नाशिकच्या (CREDAI Nashik )माध्यमातून सभासदांच्या हितासाठी काम करताना शहराच्या विकासाबाबतही विशेष लक्ष दिले जाणार आहे. कृती, लक्ष, सुयोग, करुणा व अद्भूत या पंचसूत्रावर काम करून क्लीन सिटी, ग्रीन सिटी, हेल्दी सिटी बनवण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रो कटिबद्ध राहणार असल्याचे अभिवचन नवनिर्वाचित अध्यक्ष कृणाल पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दिले.

तीन दशकांहून अधिक कालावधीपासून कार्यरत बांधकाम व्यावसायिकांची सर्वात मोठी संस्था क्रेडाई नाशिक मेट्रोच्या 2023 – 25 च्या नूतन कार्यकारिणीच्या पदग्रहणप्रसंगी ते बोलत होते. या पदग्रहण समारंभात वर्ष 2023 -25 साठी नूतन अध्यक्ष कृणाल पाटील यांनी कार्यकारिणीसहित क्रेडाई नाशिक मेट्रोचे मावळते अध्यक्ष रवी महाजन यांच्याकडून पदभार स्वीकारला.

या प्रसंगी कार्यक्रमास राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री दादा भुसे, आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, आ. सत्यजित तांबे, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रमोद खैरनार, क्रेडाई राष्ट्रीयचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, क्रेडाई राष्ट्रीय घटना समितीचे प्रमुख सल्लागार जितूभाई ठक्कर, क्रेडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष सुनील कोतवाल, क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील, नेमीचंद पोद्दार, विजय संकलेचा, सुनील भायभंग, अविनाश शिरोडे, जयेश ठक्कर, उमेश वानखेडे व माजी उपमहापौर अजय बोरस्ते हे मान्यवर उपस्थित होते.

नाशिकहून सुरू झालेल्या क्रेडाईने आता देशभरात विस्तार केला असून आजमितीला देशातील 217 शहरांमध्ये 13000 हून अधिक सदस्य क्रेडाईशी जोडलेले आहेत. नाशिकमध्ये क्रेडाईचे 450 हून अधिक सभासद असून बांधकाम व्यावसायिकांशी निगडित विविध पैलूंवर संस्था काम करते. याचसोबत बांधकाम कामगारांचे कौशल्य विकास व कल्याण, नाशिक शहराचे ब्रँडिंग या संबंधित शासकीय संस्थासोबत सकारात्मक भूमिकेतून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करते.

बांधकाम उद्योग हे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार देणारे मोठे क्षेत्र असून देशाच्या जीडीपीमध्ये देखील याचे मोठे योगदान असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना मावळते अध्यक्ष रवि महाजन आपल्या कार्यकाळातील विविध उपक्रमांचा आढावा घेत सहकार्‍यांना धन्यवाद दिले. पदभार स्वीकारल्यानंतर कृणाल पाटील आपल्या मनोगतात म्हणाले की, क्रेडाई या संस्थेचे बांधकाम उद्योगात मोलाचे स्थान आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन व युवा सदस्यांचे सहकार्य यामुळे क्रेडाई नाशिक मेट्रो येत्या काळात नवीन उंची गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जितूभाई ठक्कर यांनी क्रेडाई राष्ट्रीय कार्यकारणीची स्थापना व वाटचालीतील नाशिकच्या योगदानाबद्दल माहिती सांगितली. अनंत राजेगावकर यांनी क्रेडाई नाशिक मेट्रोची वाटचाल विषद केली. सुनील कोतवाल यादी राज्याच्या व नाशिक मेट्रोच्या वाटचालीचा कार्यप्रणालीचा आढावा सादर केला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

क्रेडाई 2023 -25 ची कार्यकारिणी – अध्यक्ष – कृणाल पाटील, मानद सचिव – गौरव ठक्कर, उपाध्यक्ष – दीपक बागड, सुजॉय गुप्ता, जयंत भातंंबरेकर, नरेश कारडा, कोषाध्यक्ष – हितेश पोतदार, सहसचिव – सचिन बागड, अनिल आहेर, नरेंद्र कुलकर्णी, ऋषीकेश कोते, मॅनेजिंग कमिटी – मनोज खिंवसरा, अंजन भलोदिया, अतुल शिंदे, श्रेणीक सुराणा, हंसराज देशमुख, नितीन पाटील, शामकुमार, साबळे, सागर, शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, निषित अटल, निमंत्रित सदस्य – सुशिल बागड, सचिन चव्हाण, निरंजन शहा, सतीश मोरे, करण शहा, प्रकाश चौधरी, तुषार संकलेचा, युथविंग समन्वयक – शुभम राजेगावकर, युथविंग सहसमन्वयक – सुशांत गांगुर्डे, महिला विंग सहसमन्वयक – वृषाली महाजन.

नाशिकची कॉलिटी सिटीमध्ये निवड

केंद्र सरकारने देश पातळीवर पाच शहरांची कॉलिटी सिटीसाठी निवड केली असून त्यामध्ये नाशिकचा समावेश आहे. स्वच्छता स्किल ट्रेनिंग व शिक्षण या तीन गोष्टींवर काम केले जाणार आहे. नाशिकमधील सेवाभावी संस्थांना विश्वासात घेऊन आगामी पाच वर्षांत नाशिक शहर मॉडेल शहर करण्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे. त्यानंतर नाशिकचे अनुकरण देशपातळीवर इतर शहरांद्वारे केले जाणार आहे. यासाठी केंद्राकडून निधी उपलब्ध केला जाणार असल्याने नाशिककरांनी आगामी काळात नाशिकला कॉलिटी सिटी बनवण्यासाठी सक्षमपणे काम करावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

भूमी अभिलेखासाठी 1600 रोवर उपलब्ध केले आहेत. एका महिन्यात मोजणीचा नकाशा मिळणे अपेक्षित आहे. आयजीआरचे संकलन खासगी क्षेत्राकडे सोपवली जाणार आहे. तीन ते चार महिन्यांमध्ये त्याला आधुनिक लुक येईल. 35 हजार कोटी रुपये यासाठी खर्च अपेक्षित करण्यात आला आहे. करदात्यांना त्याचा लाभ मिळावा, हा यामागील उद्देश आहे. रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टमच्या माध्यमातून आता एफर्डेबल हाऊसिंग योजना महानगरांच्या बाहेर नेण्याचा संकल्प असून क्रेडाई नाशिकने यात पुढाकार घेऊन राज्याला एक मार्गदर्शक प्रकल्प द्यावा, ज्यातून एफर्डेबल हाऊसिंग योजना गतिमान करणे शक्य होईल, अशी अपेक्षा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या