Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमगोल्ड व्हॅल्युअरशी संगनमत करून पतसंस्थेत ठेवले बनावट सोने

गोल्ड व्हॅल्युअरशी संगनमत करून पतसंस्थेत ठेवले बनावट सोने

पारनेरमधील प्रकार || 47 लाखांची फसवणूक, 11 जणांविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

10 कर्जदारांनी गोल्ड व्हॅल्युअरसोबत संगनमत करून बनावट सोने तारण ठेवत पतसंस्थेकडून 46 लाख 91 हजारांचे कर्ज घेतले व त्यातील एक रुपयाही पुन्हा न भरता पतसंस्थेची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार पारनेर तालुक्यातील गोरेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. गोरेगाव या शाखेत घडला आहे. या प्रकरणी गोल्ड व्हॅल्यूअर आणि 10 कर्जदार अशा 11 जणांच्या विरूध्द पारनेर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या 11 पैकी एका संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

याबाबत पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक जालिंदर जनाजी नरसाळे (वय 51 रा. गोरेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. गोरेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. गोरेगाव या शाखेत 12 जून 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत सोने तारण कर्जदार आशा बाळासाहेब कोल्हे (रा. नागेश्वर मंदिराजवळ, पारनेर), भारती अनिल देवज्ञ (रा. नागेश्वर मंदिराजवळ, पारनेर), राहुल बाळासाहेब कावरे (रा. सिध्देश्वरवाडी ता. पारनेर), बाळासाहेब संपत कोल्हे (रा. नागेश्वर मंदिराजवळ, पारनेर), अंबादास दिलीपराव औटी (रा. लोणी हवेली रस्ता, पारनेर), पोपट इंद्रभान सोडकर (रा. लोणी हवेली ता. पारनेर), राजेंद्र अर्जुन काणे (रा. चिंचोली रस्ता, पारनेर), शंकर पोपट औटी (जुनीपेठ, पारनेर), दिलीप निवृत्ती खोसे (रा. सरकारी दवाखान्याजवळ, पारनेर), सुजाता शैलेंद्र डहाळे (रा. आभूषण ज्वेलर्स, शिवाजी रस्ता, पारनेर) व गोल्ड व्हॅल्यूअर शैलेंद्र चंद्रकांत डहाळे या सर्वांनी आपसात संगनमत करून, पतसंस्थेचे नुकसान व स्वतः चा फायदा करून घेण्याच्या उद्देशाने, पतसंस्थेत सोने तारण कर्जाकरिता येणारे सोने खरे आहे अगर कसे? याची वजन व शुध्दता तपासण्याकरिता लेखी पत्राव्दारे गोल्ड व्हॅल्यूअर म्हणून नेमणूक केलेल्या शैलेंद्र चंद्रकांत डहाळे याने 10 कर्जदार यांनी आणलेले बनावट सोने देऊन ते खरे असल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार केले.

तसेच फसवणुकीच्या उद्देशाने ते खरे म्हणून पतसंस्थेत दाखल करून त्याच्या मोबदल्यात संस्थेकडून 10 जणांच्या नावावर वेगवेगळ्या रकमेचे कर्ज उचलले. या कर्जाचा एकही हफ्ता न भरता पतसंस्थेचा विश्वासघात करून पतसंस्थेची एकूण 46 लाख 91 हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित 11 आरोपींच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील बाळासाहेब संपत कोल्हे याला पारनेर पोलिसांनी अटक केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...