Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमCrime News : क्रिकेट व शेअर बाजार सट्टा रॅकेट उघड

Crime News : क्रिकेट व शेअर बाजार सट्टा रॅकेट उघड

हॉटेल सिंग रेसिडेन्सीवर छापा || स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तारकपूर परिसरातील हॉटेल सिंग रेसिडेन्सी येथे छापा टाकत क्रिकेट सामन्यावर व शेअर बाजारावर ऑनलाईन सट्टा खेळविणार्‍या दोघांना रंगेहाथ पकडले. यावेळी मोबाईल फोन, वही, कॅल्क्युलेटर व बनावट ओळखपत्रासह सुमारे 17 हजार 100 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयित आरोपींविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सोमवारी (4 ऑगस्ट) सकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांनी उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, अंमलदार लक्ष्मण खोकले, संतोष खैरे, बिरप्पा करमल, अरूण मोरे व अर्जुन बडे यांना सूचना दिल्या की, हॉटेल सिंग रेसिडेन्सीच्या खोली क्रमांक 201 मध्ये दोन इसम क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळवत आहेत. त्यानुसार, दोन पंच समक्ष हॉटेलमध्ये कारवाई करण्यात आली. खोली क्रमांक 201 मध्ये मधुकर सखाराम येवले (रा. मुलुंड कॉलनी, मुंबई) हा इसम आढळून आला. त्याच्यासोबत आणखी एक इसम असल्याचे सांगण्यात आले मात्र त्याचे नाव-गाव सांगितले गेले नाही.

YouTube video player

रूमची पाहणी केली असता, एका मोबाईलवर पाकिस्तान व वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 क्रिकेट सामना सुरू असल्याचे निदर्शनास आले. मोबाईलच्या मेसेजमध्ये विविध आयडी, संकेतशब्द आणि ऑनलाइन सट्टा संबंधित माहिती आढळून आली. शिवाय वहीमध्येही वेगवेगळ्या बुकींची नावे, क्रमांक आणि संकेतशब्द नोंदलेले आढळले.

बनावट कागदपत्रांचा वापर
तपासादरम्यान संशयित आरोपीने कबूल केले की, त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बनावट आधारकार्ड तयार करून त्याचा वापर हॉटेलमध्ये खोली बुकिंगसाठी केला होता. तसेच दुसर्‍याच्या नावाने सिमकार्ड घेतले असून त्याव्दारे सट्टा खेळविला जात होता.

सट्टेबाजांशी थेट संपर्क
जप्त मोबाईलमधून संशयित आरोपींचा आनंद (ठाणे), मोनू (ग्वाल्हेर), पिंटू (अंधेरी), वाजूभाई (अंधेरी), संतोष मारू (विरार), यश मंगोलकर, जितो (जालना), रिंकू सेठ (ठाणे) अशा व्यक्तींशी संपर्क असल्याचे आढळले. हे सर्वजण विविध ऑनलाईन सट्टा संकेतस्थळांवर क्रियाशील असल्याचे पुरावे मोबाईलमध्ये आढळले.

ताज्या बातम्या

Rahata : शिर्डीतील तरुणाला जिवंत जाळले, कुख्यात पोकळेसह टोळी जेरबंद

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata अहिल्यानगर जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक अत्यंत भीषण आणि निर्घृण खुनाची घटना उघडकीस आली आहे. राहाता परिसरातून बेपत्ता झालेल्या सचिन गिधे या तरुणाचा...