दिल्ली | Delhi
एकदिवसीय क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेच्या (ICC World Cup 2023) वेळापत्रकाची घोषणा आज आयसीसीसी (ICC) म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं केली आहे. भारताचा पहिला सामना 5 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. तर भारत पाकिस्तानदरम्यानचा हाय व्होल्टेज सामना 15 ऑक्टोबर 2023 रोजी खेळवला जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. आज मुंबईमध्ये आयसीसी आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने आयोजित केलेल्या एका संयुक्त कार्यक्रमामध्ये या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली. भारतामध्ये आयोजित केल्या जात असलेल्या या स्पर्धेला 100 दिवस शिल्लक असतानाच वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे.
पुण्यात चाललंय काय? MPSC करणाऱ्या तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने वार, धक्कादायक Video आला समोर
भारतामधील 12 मैदानावर विश्वचषकाचे सामने रंगणार आहेत. फायनल अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअवर खेळवण्यात येणार आहे. सेमीफायनलचे सामने कोलकाता आणि मुंबईच्या मैदानावर होणार आहेत. अहमदाबाद, दिल्ली, बेंगलोर, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, धर्मशाला, लखनऊ, पुणे, त्रिवेन्द्रम आणि गुवाहटी येथे विश्वचषकाचे सामने होणार आहेत. नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पाच सामने होणार आहेत. यामध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील उद्घाटानाचा सामना होणार आहे. त्याशिवाय भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरारही याच मैदानावर होणार आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना होणार आहे. फायनलचा थरारही अहमदाबाद मैदानावर होणार आहे.
विश्वचषक स्पर्धेत एकूण 10 संघांमध्ये 48 सामने खेळल्या जाणार आहेत. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका या मेगा स्पर्धेसाठी आधीच पात्र झाले आहेत. उर्वरित दोन संघ या महिन्यात झिम्बाब्वे येथे सुरू होणाऱ्या पात्रता स्पर्धेद्वारे निश्चित केले जातील. पात्रता स्पर्धांमध्ये वेस्ट इंडिज, श्रीलंका, नेदरलँड, आयर्लंड, नेपाळ, ओमान, स्कॉटलंड, संयुक्त अरब अमिराती आणि यजमान झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.
असे आहेत भारतीय संघाचे सामने..
-
८ ऑक्टोबर – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
-
११ ऑक्टोबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
-
१५ ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
-
१९ ऑक्टोबर – भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे
-
२२ ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
-
२९ ऑक्टोबर – भारत विरुद्ध इंग्लंड, लखनौ
-
२ नोव्हेंबर – भारत विरुद्ध क्वालिफायर, मुंबई
-
५ नोव्हेंबर – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
-
११ नोव्हेंबर – भारत विरुद्ध क्वालिफायर, बेंगळुरू