Sunday, November 24, 2024
Homeक्रीडाराज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा; नाशिकचा निर्णायक तर नगरचा आघाडीने विजय

राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा; नाशिकचा निर्णायक तर नगरचा आघाडीने विजय

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकमध्ये शनिवार व रविवारी झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या (सीनियर इन्विटेशन लीग), दोन दिवसीय कसोटी सामन्यांत नाशिकने नांदेड विरुद्ध निर्णायक विजय मिळवला. अशा रितीने नाशिक संघाने चार सामन्यांत निर्णायक विजय व एका सामन्यात पहिल्या डावात आघाडी अशी कामगिरी करून ब गटात पहिले स्थान मिळवले तर दुसर्‍या सामन्यात अहमदनगरने युनायटेड, पुणे विरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळवले.

- Advertisement -

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे नांदेड विरुद्ध नाशिक सामना रंगला. नाशिक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले. नांदेड पहिला डाव सर्वबाद 114 वर उरकला. यात उबेद खान 48, तेजस पवार 6, पवन सानप 3 तर यासर शेख 1 बळी. नाशिक पहिला डाव सर्वबाद 283 – सत्यजित बच्छाव 61, हर्षद मेर 50, मुर्तुझा ट्रंकवाला 45, विकास वाघमारे 41, सचिन जाधव 5, यश यादव व उबेद खान प्रत्येकी 2 तर सुनील यादव 1 बळी. नांदेड दुसरा डाव – सर्वबाद 110 यश यादव 36. तेजस पवार व यासर शेख प्रत्येकी 3 तर पवन सानप व कुणाल कोठावदे प्रत्येकी 2 बळी मिळवले. नाशिक एक डाव व 59 धावांनी विजयी झाला.

सय्यद पिंपरी क्रिकेट मैदान युनायटेड, पुणे विरुद्ध अहमदनगर युनायटेड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. युनायटेड पहिला डाव सर्वबाद 162 वर अटोपला. यामध्ये रोहित करंजकर 46, रोनक खंडेलवाल 6 तर सय्यद कादिर 4 बळी. अहमदनगर पहिला डाव सर्वबाद 198 उरकला. यामध्ये अजीम काझी 59, अनोश भोसले नाबाद 58, रामकृष्ण घोष 4, संजय परदेशी 3, तरुण वालानी 2 व रोहित करंजकर 1 यांनी बळी घेतले. युनायटेडचा दुसरा डाव 9 बाद 213 वर अटोपला. यात निखिल काळे 53, आदित्य विजय 47, पराग मोरे 46, रोनक खंडेलवाल 3 तर श्रीपाद निंबाळकर, सय्यद कादिर व अजीम काझी प्रत्येकी 2 बळी. अहमदनगर दुसरा डाव 4 बाद 98 आतिश भांबरे 29, रामकृष्ण घोष, संजय परदेशी, तरुण वालानी व रोहित करंजकर प्रत्येकी 1 बळी मिळवला, यामुळे सामना अनिर्णीत राहिला तर अहमदनगरला पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या