Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRinku Singh Priya Saroj Engagement : क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि खासदार प्रिया...

Rinku Singh Priya Saroj Engagement : क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा झाला साखरपुडा

दोघांच्या खास लुकची होतेय चर्चा, Video आला समोर

नवी दिल्ली | New Delhi

भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंह (Rinku Singh) आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज (Priya Saroj) यांचा आज (रविवारी) लखनौ येथील द सेंट्रम हॉटेलमध्ये मोजक्या आणि प्रतिष्ठित मंडळींच्या उपस्थितीत साखरपुडा (Engagement ) संपन्न झाला. या कार्यक्रमाला दोन्ही कुटुंबियातील मंडळींसह क्रिकेट आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली.

- Advertisement -

नुकतेच रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले असून, त्यात दोघांच्या लुकची तुफान चर्चा होत आहे. रिंकू आणि प्रिया या जोडीनं साखरपुड्यात पांढऱ्या अन् गुलाबी आउटफिट्ससह परफेक्ट मॅचिंग केल्याचे बघायला मिळाले. साखरपुड्याच्या सोहळ्या आधी या जोडीनं प्री वेडिंग फोटोशूटही केले. ते फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

YouTube video player

कोण आहेत प्रिया सरोज?

उत्तरप्रदेशच्या मछलीशहर लोकसभा मतदारसंघाच्या प्रिया सरोज या समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) बी.पी. सरोज यांचा ३५ हजार हून अधिक मतांनी पराभव केला आहे. सध्या त्या संसदेतील सर्वात तरुण महिला खासदारांपैकी एक आहेत. तसेच निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार प्रिया सरोज यांची संपत्ती सुमारे ११.२५ लाख रुपये असून, जी बहुतांश बँक खात्यांमध्ये जमा आहे.

ताज्या बातम्या

पियुष

Piyush Goyal: “दोन्ही पक्षांचे हित जपले गेले आहे, या व्यापार करारामुळे…”,...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiभारत आणि अमेरिकेमध्ये झालेल्या व्यापार करारावरून आज लोकसभेमध्ये जोरदार गदारोळ झाला. या करारामुळे भारतीय बाजारपेठ ही अमेरिकन कृषी उत्पादनांना...