Saturday, May 4, 2024
Homeनाशिकप्रहार संघटनेच्या पदाधिकार्‍यावर विनयभंगाचा गुन्हा

प्रहार संघटनेच्या पदाधिकार्‍यावर विनयभंगाचा गुन्हा

नाशिक | Nashik

ठक्कर बाजार परिसरात एका कार्यालयात झालेल्या मारहाण प्रकरणानंतर प्रहार संघटनेच्या पदाधिकार्‍यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख अनिल भडांगे, युवा प्रमुख जगन काकडे तसेच इतर पदाधिकारी अशी गुन्हे दाखल झालेल्यांंची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी पिडीतेने तक्रार दाखल केली आहे.

यात म्हटले आहे की, 18 सप्टेंर रोजी सायंकाळी प्रहार संघटनेचे पदाधिकारी भडांगे, काकडे व इतर दोघांनी इंजिनिअर शरद पवार यांच्या कार्याल्यात येऊन पवार यांना बाहेर ओढून मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

फिर्यादी यांना त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता भडांगे यांनी पिडीत महिलेस मारहाण केली. तर इतर दोघांनी त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान 16 सप्टेंबर रोजी इंजिनिअर शरद पवार याने भडांगे तसेच त्यांच्या सहकार्‍यास चाकूचा धाक दाखवत प्रहार संघटना, बच्चु कडून यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार हनुमानवाडी परिसरात घडला होता.

या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हा प्रकार या वादातून घडल्याची चर्चा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या