Saturday, October 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशकात अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

नाशकात अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

नाशिक | प्रतिनिधी New Nashik

नाशिक मधील मुंबई नाकापरिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६४ हजार ५०० रुपये किमतीचे २१.५ ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

- Advertisement -

या कारवाईदरम्यान पथकाने साडे आठ हजार रुपयांची रोकड तसेच चारचाकी वाहन देखील जप्त केले असून, एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

संशयित प्रशित अडांगळेच्याविरुद्ध अमली पदार्थ नियंत्रण कायद्यानुसार (एनडीपीएस ऍक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर मुंबई नाका पोलिस ठाण्यात पुढील तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : महिनाभरातच नववधूचे बिंग फुटले, चार मुलांची आई असल्याचे उघड

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचा गैरफायदा घेत मुंबईतील एका एजंट महिलेने राहुरी तालुक्यातील तरुणाला लग्नासाठी मुलगी दाखवून त्याच्याकडून चार लाख रुपये उकळले. मोठ्या...