Saturday, May 4, 2024
HomeधुळेCrime कॉपर केबलसह सोलर प्लेट चोरी करणारी टोळी जेरबंद

Crime कॉपर केबलसह सोलर प्लेट चोरी करणारी टोळी जेरबंद

धुळे – प्रतिनिधी dhule

साक्री (sakri) तालुक्यातील भामेर व सालटेक शिवारातील सोलर प्लांटमधून (Solar plant) कॉपर केबलसह सोलर प्लेट चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफिने जेरबंद केले आहे. त्यात माल खरेदी करणाऱ्या दोघांचा समावेश आहे.

- Advertisement -

या पाचही जणांकडून साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती आज पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

निजामपुर पोलीस ठाणे हद्दीतील भामेर व सालटेक शिवारात गेल सोलर फार्मसी कंपनी असून येथील विविध ब्लॉकमधील एकुण 52 हजार रुपये किंमतीची कॉपर केबल वायर व 3 सोलर मोडयुल अज्ञात चोरट्यानी चोरुन नेवून नुकसान केले. दिनांक 8 ते 9 ऑगस्ट दरम्यान ही चोरीची घटना घडली. याबाबत कंपनीचे सेवा कार्यकारी प्रशासन मोहन नामदेव ब्राम्हणे

यांच्या फिर्यादीवरुन दि.2 रोजी निजामपुर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 379, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत सुरु असतांना पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनिय माहीती मिळाली की, हा गुन्हा भामेर येथील दिनेश संजय सोनवणे व राजेंद्र गोटू सोनवणे व सोनु गायकवाड यांनी केला आहे. तसेच त्यांनी परीसरातील अनेक ठिकाणाहून कॉपर केबल व सोलर प्लेट चोरी केल्या असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार निरीक्षक पाटील पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने दोघांना भामेर गावातून ताब्यात घेतले दिनेश संजय सोनवणे (वय 23) व राजेंद्र गोकुळ सोनवणे वय 20 (रा. भामेर) अशी दोघांनी त्यांची नावे सांगितली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

मालाबाबत विचारणा केली असता त्यांनी सुमारे 7 ते 8 महिण्यापासुन चोरी केलेला माल साक्री येथील नदीम खान याकूब खान पठाण (रा. कासार गल्ली, साक्री), सोनु ऊर्फ वसीम अली शेरअली सैय्यद ( रा. ओमशांती नगर, साक्री) व सलमान शेख सिराज ( रा. पोळा चौक साक्री) यांना विक्री केला असल्याचे सांगितले. हा चोरी केलेला माल वाहतुकीसाठी नदीम खान यांची कार वापरण्यात आल्याने कारसह त्यांचा शोध घेता तिघेही मिळुन आले. वरील पाचही आरोपीतांकडुन 24 हजार रुपये किमतीची 80 किलो कॉपर केबल, 6 हजारांच्या तीन सोलर प्लेट, 3 लाख रुपये किमतीची कार (क्र. एम.एच. 14 एच. के. 6566), वेगवेगळ्या कंपनीचे तीस हजार रुपये किमतीचे एकुण 6 मोबाईल असा एकूण मुद्देमाल 3 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान नदीम खान याच्यावर यापूर्वी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. नदीम खान याचेकडुन चोरीची कॉपर केबल खरेदी करणारे बबलु उर्फ पेटु मुनाफखान पठाण, समीर खान मुनाफखान पठाण, नईम बेलदार सर्व (रा.साक्री) व कॉपर केबल चोरी करणारा सोनु गायकवाड (रा. भामेर ता.साक्री) यांचा शोध सुरु आहे. या आरोपीतांकडुन निजामपुर पोलीस ठाण्यात दाखल पाच चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पोसई बाळासाहेब सुर्यवंशी, असई संजय पाटील, पोहेकॉ संदिप सरग, पोहेकॉ अशोक पाटील, पोना कुणाल पानपाटील, रविकिरण राठोड, उमेश पवार, पोकॉ विशाल पाटील, गुलाब पाटील, कैलास महाजन यांच्या पथकाने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या