जामखेड | तालुका प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील हनुमानगड येथील मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे यांच्या विरोधात लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले बद्दल गुन्हा जामखेड तालुक्यातील एका गावातील महिलेने गुन्हा दाखल केला आहे.
महिलेने फिर्यादीत म्हटले आहे की, बुवासाहेब जिजाबा खाडे याने जून २०२२ ते १२ जुलै २०२२ या कालावधीत फिर्यादीला दागिने तसेच लग्न करण्याचे आमिष दाखवून फिर्यादीच्या संमतीशिवाय खाडे याने शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी खाडे विरोधात गुरुवारी रात्री ११.३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास खर्डा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील हे करत आहेत
दरम्यान मठाधिपती खाडे यांनी आपल्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ५ जणांविरोधात खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . सोन्याची चेन, अंगठ्या, मणी असा १३ लाख ६० हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. खाडे यांच्या फिर्यादीवरून बाजीराव गीते, भिवा गोपाळघरे, अरुण गीते, राहुल संपत गीते, रामा गीते (सर्व रा. मोहरी, ता. जामखेड ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.