Friday, April 25, 2025
Homeक्राईमCrime News : धक्कादायक! कोपरगावात गाठोड्यात बांधलेला मुलाचा मृतदेह नदीत आढळला

Crime News : धक्कादायक! कोपरगावात गाठोड्यात बांधलेला मुलाचा मृतदेह नदीत आढळला

कोपरगाव । तालुका प्रतिनिधी

एका चिमुरड्याचा मृतदेह गाठोड्यात बांधून नदीत फेकून दिल्याची माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना शुक्रवारी संध्याकाळी कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात उघडकीस आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस पोहोचले असून मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे. सदर बालहत्येचा प्रकार असल्याची चर्चा असून बालकाची हत्या कोणी आणि का केली? याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाणीपात्रात पांढऱ्या रंगाच्या एका गाठोड्यात लहान मुलाचा मृतदेह असल्याचे ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ कोपरगाव तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले.

सदर गाठोड्याला बाहेर काढून बघितले असता त्यामध्ये अंदाजे पाच ते सहा वर्ष वय असलेल्या एका मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. सदर बालकाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याबाबत पोलीस गुन्हा दाखल करून पुढील तपासाची चक्रे फिरवणार आहेत.

घटनास्थळी शिर्डी उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांनीही भेट दिली आहे. नेमका हा प्रकार काय ? सदर बालकाची हत्या झाली तर ती कोणी आणि कशासाठी केली असावी? अशा प्रकारची चर्चा असून याबाबत खरी माहिती शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि पोलीस तपासानंतरच समोर येणार आहे. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...