Saturday, July 27, 2024
HomeनगरCrime News : शेतकर्‍याला रस्त्यात अडवून मोबाईल व ऑनलाईन 14 हजारांची लूट

Crime News : शेतकर्‍याला रस्त्यात अडवून मोबाईल व ऑनलाईन 14 हजारांची लूट

कोंढवड (वार्ताहर)

दूध घेऊन मोटरसायकलवरुन जात असलेल्या शेतकर्‍याला दि. 18 जुलै 2023 रोजी रात्रीच्या दरम्यान राहुरी सोनई रस्त्यावर अडवून त्यांची ऑनलाईन 14 हजार रूपयांची लूटमार करत त्यांचा मोबाईल हिसकावून नेला. ही घटना राहुरी-सोनई रोडवरील पिंप्री अवघड परिसरात घडली आहे.

- Advertisement -

तक्रार घेऊन आलेल्या महिलेवर पोलीस उपनिरीक्षकाकडूनच अत्याचार, राहुरीमध्ये खळबळ

दिलीप जगन्नाथ गुंजाळ, (वय 50 वर्षे), हे राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे राहत असून शेती व दूध व्यवसाय करतात. दि. 18 जुलै 2023 रोजी रात्री 8.30 वाजे दरम्यान दिलीप गुंजाळ हे त्यांच्या मोटरसायकलवर दूध घेऊन डेअरीमध्ये जात होते. दरम्यान ते राहुरी ते सोनई जाणारे रोडने जात असताना पिंप्री अवघड शिवारात पवार यांच्या विटभट्टीजवळ असताना त्यांच्या पाठीमागून पल्सर मोटरसायकलवर आलेल्या एका भामट्याने त्यांना थांबवले. मी अन्न व भेसळ प्रशासनाकडुन आलो आहे. तुमच्या दुधात भेसळ आहे. तुम्ही नेत असलेले दूध चेक करायचे आहे. असे म्हणून त्या भामट्याने दुधाच्या कॅनचे झाकण उघडून दिलीप गुंजाळ यांना ढकलुन देवुन त्यांच्याकडून त्यांचा मोबाईल व आधारकार्ड हिसकावुन घेतले. त्यानंतर भामट्याने दिलीप गुंजाळ यांना दमदाटी करुन त्यांच्या मोबाईल वरून दुसर्‍या एका नंबरवर फोन पे द्वारे 14 हजार रुपये टाकले. तसेच तो भामटा दिलीप गुंजाळ यांचा पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल घेऊन पसार झाला. अशाप्रकारे त्या भामट्याने दिलीप जगन्नाथ गुंजाळ यांची एकूण 19 हजार रुपयांची लूटमार केली आहे.

Crime News : जोधपूर हादरलं! ६ महिन्यांच्या चिमुकल्यासह चौघांना संपवलं अन् अंगणात फरफटत आणून पेटवलं

घटनेनंतर दिलीप जगन्नाथ गुंजाळ यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या