Monday, March 31, 2025
Homeब्रेकिंग न्यूजCrime News : शासकीय बांधकाम ठेकेदाराचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपींवर 'मकोका'...

Crime News : शासकीय बांधकाम ठेकेदाराचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई

पुणे | प्रतिनिधी | Pune

शासकीय बांधकाम ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण करून दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी निर्घुण खून करण्यात आल्याचा प्रकार घडला होता .या खून प्रकरणात मुख्य गुन्हेगार योगेश उर्फ बाबू भामे याच्यासह साथीदार आरोपी विरुद्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिले.

- Advertisement -

योगेश उर्फ बाबू किसन भामे (वय ३२), राेहित उर्फ बाळा किसन भामे (वय २२, दोघे रा. डोणजे, सिंहगड पायथा, ता. हवेली), शुभम पोपट सोनवणे (वय २४, सध्या रा. नगर रस्ता, मूळ रा. खळवाडी, चिंचोली गुरव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), मिलिंद देवीदास थोरात (वय २४, सध्या रा. वाघोली, नगर रस्ता, मूळ रा. बेलगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर), रामदास दामोदर पोळेकर (वय ३२, रा. पोळेकरवाडी, डोणजे, सिंहगड पायथा, ता. हवेली) अशी ‘मकोका’ कारवाई केलेल्या आरोपीची नावे आहेत.

शासकीय बांधकाम ठेकेदार विठ्ठल पोळेकर १४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी फिरायला निघाले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या आरोपी योगेश भामे आणि त्याच्या साथीदारांनी ठेकेदार पोळेकर यांना धमकावून त्यांचे कार मधून अपहरण केले. त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करत त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन संबंधित तुकडे हे खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात फेकून दिले होते.

आरोपी योगेश भामे आणि साथीदारांनी सिंहगड रस्ता, डोणजे, खडकवासला परिसरात गंभीर गुन्हे केले होते. त्यांनी ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांच्याकडे दोन कोटीं रुपयांची खंडणी मागितली होती. पोळेकर यांच्याकडून रस्त्याचे काम करण्यात येत होते. भामे याने रस्त्याच्या कामात अडथळा आणण्याची धमकी दिली होती, तसेच भामे याने पोळेकर यांच्याकडे आलिशान कार मागितली होती. खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांचे अपहरण करुन निर्घृण खून केला होता. याप्रकरणाचा तपास ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखा, तसेच हवेली पोलिसांनी केला होता. टोळीचे वर्चस्व वाढविण्यासाठी भामे आणि साथीदारांनी गुन्हा केल्याचे तपासात उघडकीस आले होते.

भामे आणि साथीदारांविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्याचा प्रस्ताव हवेली पोलिसांनी तयार केला. संबंधित प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे यांच्याकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आला. या प्रस्तावाची पडताळणी करण्यात आल्यानंतर भामेसह साथीदारांविरुद्ध ‘मकोका’ कारवाईचे आदेश देण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी तपास करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : काेयत्याचा धाक दाखविणारा ताब्यात

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिकराेड (Nashik Road) येथील विहितगाव परिसरातील वालदेवी नदीवरील पुलावर (Valdevi River Bridge) ये-जा करणाऱ्या नागरिकांना कोयत्याचा धाक दाखविणाऱ्या संशयिताला अटक...