Sunday, May 26, 2024
Homeनगरनगरसेवक शिंदे टोळीवर एक हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल

नगरसेवक शिंदे टोळीवर एक हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी)

राष्ट्रवादीचे कार्यकर्त्ये अंकुश दत्तात्रय चत्तर (वय 35 रा. पद्मानगर, सावेडी) यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून करणार्‍या भाजपाचा नगरसेवक स्वप्निल शिंदे व त्याच्या टोळी विरोधात पोलिसांनी मुख्य न्यायदंडाधिकारी आर.डी.चव्हाण यांच्या न्यायालयात सुमारे एक हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. चार अल्पवयीन मुलांसह 12 संशयित आरोपींचा यामध्ये समावेश आहे. पूर्वीचा वाद व लहान मुलांच्या भांडणातून अंकुश चत्तर यांचा खून केल्याचा दोष शिंदे टोळीवर ठेवण्यात आला आहे.

- Advertisement -

भाजपाचा नगरसेवक स्वप्निल रोहिदास शिंदे, अक्षय प्रल्हाद हाके, अभिजीत रमेश बुलाख, महेश नारायण कुर्‍हे, सुरज ऊर्फ विकी राजन कांबळे, मिथुन सुनील धोत्रे, अरूण अशोक पवार, राजु भास्कर फुलारी यांच्यासह चार अल्पवयीन मुलांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
सावेडी उपनगरातील एकविरा चौकात 15 जुलैच्या रात्री शिंदे टोळीने लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोपने अंकुश चत्तर यांच्यावर हल्ला केला होता. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अंकुश चत्तर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करीत होते. हल्ला करणार्‍या शिंदेसह त्याच्या टोळीला पोलिसांनी तात्काळ अटक केली होती. चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. सदरचा प्रकार 15 जुलैच्या रात्री झालेल्या लहान मुलांच्या भांडणातून घडला असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला असता अंकुश चत्तर व स्वप्निल शिंंदे यांच्यात जमिनीच्या व्यवहारातून पूर्वीचे वाद असल्याचे समोर आले. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक गणेश वारूळे यांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून सुमारे एक हजार पानांचे दोषारोपपत्र तयार केले. ते न्यायालयात दाखल केले करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या