Friday, June 21, 2024
Homeनगरमाहेरहून पैसे आणण्यासाठी दोघा विवाहितांचा सासरी छळ

माहेरहून पैसे आणण्यासाठी दोघा विवाहितांचा सासरी छळ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

वाहने खरेदी करण्यासाठी माहेरहून पैसे आणले नाही म्हणून दोन विवाहितेचा सासरी छळ करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दोन्ही पीडित विवाहितांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 15) दिलेल्या फिर्यादीवरून दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नवनागापूर परिसरात राहणार्‍या पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून तिचा पती तन्वीर मिरीनखान पठाण, भाया मोहसिन मिरीनखान पठाण, सासू रेहाणी मिरीनखान पठाण, सासरे मिरीनखान अहमदखान पठाण, जाव फरिन मोहसिन पठाण (सर्व रा. गजनान कॉलनी, नवनागापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी या सासरी नांदत असताना त्यांना पतीसह पाच जणांनी नवीन रिक्षा घेण्याकरीता माहेरहून एक लाख रूपये घेऊन येण्यास सांगितले. फिर्यादीने पैसे आणले नाही म्हणून त्यांना शिवीगाळ, दमदाटी करून शारिरीक व मानसिक छळ करण्यात आला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मुळच्या टाकळी कडेवळीत (ता. श्रीगोंदा) व सध्या पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथे राहणार्‍या पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या पतीसह सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती परशुराम सुरेश शेंडे, सासू सुनंदा सुरेश शेंडे, सासरे सुरेश आप्पा शेंडे, दीर शिवाजी सुरेश शेंडे, आजी सासू सिताबाई आबा शेंडे (सर्व रा. टाकळी कडेवळीत), वंदना अनिल खेडकर, अनिल साहेबराव खेडकर (दोघे रा. लोणीकंद वैंकनाथ ता. श्रीगोंदा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी या सासरी नांदत असताना त्यांना पतीसह सात जणांनी चारचाकी कार घेण्याकरीता माहेरहून पाच लाख रूपये घेऊन येण्यास सांगितले. फिर्यादीने पैसे आणले नाही म्हणून त्यांना शिवीगाळ, दमदाटी करून शारिरीक व मानसिक छळ करण्यात आला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या