Saturday, May 25, 2024
Homeनगरडोक्यात फोडली दारूची बाटली

डोक्यात फोडली दारूची बाटली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

डानेडबरा, मंगलगेट येथे माल खाली करणार्‍या हमालाने टेम्पो चालकाच्या डोक्यात दारूची काचेची बाटली फोडून त्याला जखमी केले. राजेंद्र जगन्नाथ वहाकर (वय 43 रा. हिंदूत्व चौक, तपोवन रस्ता) असे जखमी टेम्पो चालकाचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि. 24) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास घडली असून याप्रकरणी जखमी वहाकर यांनी सोमवारी (दि. 25) तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

दिलेल्या फिर्यादीवरून सोमनाथ लांडे (रा. कोठला) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी वहाकर हे डानेडबरा येथील एस.पी.महादेव ट्रान्सपोर्ट येथे टेम्पोतील माल खाली करून बसले होते. तेथे हमाल म्हणून काम करणारा सोमनाथ लांडे याने वहाकर यांना विनाकारण दारूच्या नशेत शिवीगाळ करून मारहाण केली. काचेची दारूची बाटली डोक्यात फोडून जखमी केले. ‘तु तुझा टेम्पो घेऊन येथे आला तर तुला जिवे ठार मारून तुझा टेम्पो फोडून टाकीन,’ अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या