अहमदनगर (प्रतिनिधी)
बहिण- भावाच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना नगर शहरात घडली आहे. भावानेच आपल्या सख्या अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केला असून पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी केलेल्या तपासणीतून समोर आले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मुलावर अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
फिर्यादी हे मुळचे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एका गावचे रहिवाशी असून ते सध्या नगर शहरातील एका उपनगरात पत्नी, 17 वर्षीय मुलगी व मुलासह राहतात. मुलीला गेल्या सहा वर्षापासून थायरॉईड असल्याने तिच्यावर औषध उपचार सुरू आहेत. दरम्यान, गेल्या तीन महिन्यापासून मुलीला मासिक पाळी न आल्याने त्यांनी तिला गुरूवारी (दि. 20) सकाळी डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तपासणी केली असता ती 20 आठवड्याची गर्भवती असल्याचे समोर आले. हे ऐकुण मुलीच्या आई- वडिलांना धक्काच बसला. त्यांनी तिला विश्वासात घेत विचारणा केली असता तिने सांगितलेला प्रकार गंभीर होता.
Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा भडका! महिलांवर अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीचं घर संतप्त जमावाने पेटवलं
तिने तिच्या वडिलांना सांगितले, ‘मार्च महिन्यात तुम्ही आईसोबत शेतातील हरभरा काढण्यासाठी आपल्या मुळ गावी गेले होते. त्यावेळी घरी मी व भाऊ दोघेच होतो. रात्री जेवण करून मी झोपी गेले तेव्हा भावाने माझ्यासोबत बळजबरीने संबंध केले. त्याला विचारणा केली असता काही होत नाही, असे त्याने उत्तर दिले’, सर्व प्रकार ऐकुण मुलीच्या वडिलांना धक्काच बसला. त्यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
“…तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा”; मणिपूर घटनेवरुन केंद्राची खरडपट्टी काढल्यानं भाजप आमदार संतापले