Monday, May 27, 2024
Homeनगरचार सराईत गुन्हेगार गजाआड

चार सराईत गुन्हेगार गजाआड

अहमदनगर|Ahmedagar

चोऱ्या, घरफोड्या, खुनाचा प्रयत्न आणि खुन करून पसार झालेल्या चौघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले.

- Advertisement -

या आरोपींवर पेट्रोल पंपावर दरोडा टाकल्याचाही गुन्हा दाखल होता. या आरोपींकडून एक लाख 80 हजार रुपये किंमतीच्या तीन दुचाकी देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या. अहमदनगरचे अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.

आरोपींमध्ये कृष्णा विलास भोसले, सुरेश पुंजाराम काळे, रावसाहेब विलास भोसले आणि अजिनाथ विलास भोसले यांचा समावेश आहे. 1 ऑगस्ट रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास या आरोपींनी अक्षय कुंडलीक गोल्हारे यांच्या मालकीच्या नगर- सोलापूर रोडवरील साकत शिवारातील केतन पेट्रोल पंपावर दरोडा टाकून तसेच पेट्रोल पंपासमोरील उभ्या असलेल्या ट्रक चालकाला मारहाण करून 2 लाख 55 हजार 800 रूपयांचा ऐवज लंपास केला होता. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

तसेच या आरोपींनी जयवंत शिवाजी फाळके यांच्या मालकीच्या फाळके ॲण्ड सन्स या भारत पेट्रोल पंपावर देखील दरोड टाकत 1 लाख 23 हजार 500 रूपयांचा ऐवज लुटला होता. हे गुन्हे करणारे आरोपी हातवळण ता. आष्टी येथे असल्याचे माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. आरोपी विरोधात गंभीर स्वरूपाचे ५१ गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या