Friday, May 3, 2024
Homeनगरऑनलाईन लोन घेतल्यास होतेय बदनामी !

ऑनलाईन लोन घेतल्यास होतेय बदनामी !

अहमदनगर (प्रतिनिधी)

लोकांना फसविण्यासाठी सायबर चोरट्यांकडून नवनवीन फंडे वापरले जात आहे. लोन (कर्ज) (online loan app) घेण्यासाठी बँकेत हेलपाटे मारून देखील लोन मिळत नसल्याचा अनुभव अनेकांना येतो. येथे मात्र काही मिनिटांमध्ये लोन उपलब्ध करून दिले जाते, ते पण कोणत्याही कागदपत्रांशिवाय खात्यावर रक्कम जमा होते. मात्र ती वसूल करण्याची पध्दत पाहून अनेक जण पोलिसांशी संपर्क साधून फसवणूक झाल्याची माहिती देत आहे.

- Advertisement -

करोना काळात अनेकांचे व्यावसाय बंद पडले, नोकऱ्या गेल्या. यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पैशांची गरज असल्याने लोक बँकेतून काही लोन मिळते का? यासाठी पाठपुरावा करतात. मात्र बँकेतून सहज लोन उपलब्ध होत नाही. लोकांच्या आर्थिक अडचणींचा फायदा सायबर चोरटे घेत आहे. लोन देऊन ते वसूल करण्याची नवी पध्दत या चोरट्यांनी आणली आहे. अशी फसवणूक करणारे सर्व चोरटे महाराष्ट्र बाहेरचे आहेत.. आपणास लोनची ऑफर आहे, दोन ते तीन वर्षांमध्ये परतफेड करू शकता, कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. असे सांगून लोकांना लोन घेण्यास भाग पाडले जाते. त्यासाठी प्ले स्टोअरवरून फ्री अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते.

फ्री लोन अॅप डाऊनलोड केल्यानंतर आपल्या मोबाईलमधील वैयक्तिक माहिती त्यांच्याकडे जाते. आपणास लोन मंजुर करून ते खात्यावर पाठविले जाते. काही दिवस गेल्यानंतर आपल्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून आपली बदनामी केली जाते. मोबाईल नंबर, फोटोचा गैरवापर करून नातेवाईक, मित्रपरिवारांना फोन, मेसेज करून आपण कसे बदनाम आहोत, हे सांगितले जाते. बदनामी टाळण्यासाठी लोन मंजुर केलेल्या रक्कमेपेक्षा जास्त पैशांची मागणी केली जाते. पैसे दिले नाही तर बदनामीची भिती दाखविली जाते. लोक बदनामीच्या भितीने पैसे भरतात तर काही जण सायबर पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी येतात. अलिकडच्या काळात अशा तक्रार येऊन येणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

दरम्यान एखाद्या कंपनी, बँकेने लोन दिले असेल आणि त्याची परतफेड करताना संबंधीत कंपनी, बँक जास्त पैसे मागत असेल तर भादंवि कलम ४२० नुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला पाहिजे, असे सायबर पोलिसांचे म्हणणे आहे. यामुळे लोन न घेणे हाच यामागील पर्याय असल्याचे पोलीस सांगतात.

ऑनलाईन पध्दतीने एखादी व्यक्ती लोन देत असेल तर त्याची खात्री करावी. शक्यतो अधिकृत बँक, पतसंस्था यांच्याकडून लोन घ्यावे. प्रत्यक्ष भेटून याबाबत काळजीपूर्वक व्यवहार करावे, फेक कॉल, मेसेज आल्यास त्यापासून सावधान राहावे.

प्रतिक कोळी, उपनिरीक्षक, सायबर पोलीस ठाणे

- Advertisment -

ताज्या बातम्या