Saturday, May 4, 2024
Homeनगरहद्दपार असलेले तीन सराईत गुन्हेगार गजाआड

हद्दपार असलेले तीन सराईत गुन्हेगार गजाआड

अहमदनगर|Ahmedagar

हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून नगर तालुक्यात वास्तव करणाऱ्या तिघा सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

- Advertisement -

सागर चौथे (वय २८ रा. पितळे कॉलनी नागपूर), अजमुद्दिन उर्फ नुरा गुलाब सय्यद (वय ३० रा. गजानन कॉलनी, नवनागापूर), संदीप अशोक कासार (वय २८ रा. वडगाव गुप्ता ता. नगर) अशी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार पुन्हा जिल्ह्यात येऊन वास्तव करत आहेत. त्यांच्या हातून पुन्हा गुन्हे घडत असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी हद्दपार गुन्हेगार अहमदनगर जिल्हात वास्तव करत असल्यास त्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत.

त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बापूसाहेब फोलाणे, भिमराज खर्से, रवी सोनटक्के, देवेंद्र शेलार, चंद्रकांत कुसळकर यांचे पथक अशा गुन्हेगारांचा अहमदनगर जिल्ह्यात शोध घेत आहे.

२५ आॅगस्ट २०२१ रोजी अहमदनगर जिल्ह्यातून १८ महिन्यांसाठी हद्दपार केलेले तीन सराईत गुन्हेगार वडगाव गुप्ता येथील भैरवनाथ मंदिर परिसर असल्याची माहिती पोलिसांन मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सदर तीन गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. पुढील कार्यवाही एमआयडीसी पोलीस ठाणे करीत आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी (नगर ग्रामीण) अजित पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या