अकोले |प्रतिनिधी| Akole
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला अकोलेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा (पोक्सो) व विवाहीत महिलेवर कौटुंबिक हिंसाचार असे दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
अकोले तालुक्यातील एक अल्पवयीन मुलीला सोमनाथ रामभाऊ पथवे याने लग्नाचे अमिष दाखवून समंती नसताना तिला विविध ठिकाणी नेत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला व आरोपीची वहिनी ताई रामचंद्र पथवे, आई सावित्रीबाई रामभाऊ पथवे यांनी फिर्यादी अल्पवयीन मुलीला धक्काबुक्की करून घरात कोंडून ठेवले होते.
यावेळी फिर्यादी आंघोळीचा बहाणा करून तेथून पळून आली असल्याचे फिर्यादीवरून अकोले पोलीस ठाण्यात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक ढोमणे करत आहेत.
तर दुसर्या घटनेत म्हाळादेवी देवी (हल्ली भाडुंप मुंबई) येथील 32 वर्षीय महिला पोलीस असलेल्या विवाहित महिलेस तारण असलेली जमीन सोडविण्यासाठी माहेरून पैसे आणावेत म्हणून मारहाण शिवीगाळ करत अंगावरील दागिने काढून घेऊन घरातून हाकलून देत कौटुंबिक हिंसाचार केल्याचा गुन्हा अकोले पोलिसांत दाखल करण्यात आला आहे.
याबाबत म्हाळादेवी देवी (हल्ली रा. भाडुंप मुंबई) येथे राहणार्या अमृता विक्रम हासे या विवाहित महिलेने अकोले पोलिसांत फिर्याद दिली असून यात म्हटले आहे की फिर्यादी 06 मे 2007 ते 09 मे 2009 पर्यंत म्हाळादेवी ता. अकोले येथे सासरी नांदत असताना पती विक्रम दशरथ हासे, सासू भीमाबाई दशरथ हासे, सासरे दशरथ शंकर हासे, नणंद सुनीता देवराम सावंत यांनी छळ करून तारण असलेली जमीन सोडवण्यासाठी माहेरून पैसे घेऊन ये म्हणून वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केली व फिर्यादीचे अंगावरील दाग दागिने काढून घेऊन तीस घरातून हाकलून दिल्याचे फिर्यादीवरून अकोले पोलिसांत भादंवि कलम 489 अ, 406, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. आहेर करत आहेत.