नंदुरबार | प्रतिनिधी | Nandurbar
पाच ग्रॅम वजनाचे बनावट सोन्याचे कॉईन (Gold Coin) विकून १ लाख ४५ हजार ५०० रुपयांमध्ये फसवणूक (Fraud) करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दिल्ली (Delhi) येथील एकाविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात (Nandurbar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ जुलै रोजी ७ वाजेच्च्यापुर्वी नंदुरबार शहरातील सोनार गल्ली मधील एस. कुमार ज्वेलर्स या दुकानात आरिफ शहाबुद्दीन मलीक (वय २४ वर्ष रा. ८५३/३८ गल्ली नं ०९ मुस्तफाबाद दिल्ली) याने खोटे व बनावट आधारकार्ड तयार करुन व आपली ओळख उघड होवू नये म्हणुन इतर अनोळखी व्यक्तीच्या नावावर सिमकार्ड घेवुन तसेच सोने खरेदीच्या खोट्या पावत्या तयार करुन कोणत्याही व्यक्तीला नुकसान किंवा क्षती पोहचवुन फसवणुक करण्याचा उद्देशाने त्याचा खरा म्हणुन वापर करुन स्वतःचे कब्जात बाळगले.
तसेच त्यांच्या ताब्यात तीन लाल त्याच्यावर कॉईन असे त्याच्या सोन्याचा एका कॉईनचे त्यांची किंमत हजार ५०० इंग्रजीत गोल्ड लिहिलेले व मधामध गोल्ड कॉईन वजन ५ ग्रॅम अंदाजे ४८ रुपये असे एकुण ३ कॉईन त्यांची एकुण किंमत १ लाख ४५ हजार ५०० रुपयांमध्ये फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडून एक लाल रंगाचे कव्हर त्याच्यावर इंग्रजीत गोल्ड कॉईन असे लिहिलेले व त्याच्या मधोमध सोन्याचा गोल कॉईन एका कॉईनचे वजन ०५ ग्रॅम त्यांची किंमत अंदाजे ४८ हजार ५०० रुपये असे एकुण १ लाख ४५ हजार ५०० रुपये किंमतीचे ३ कॉईन, एक आधारकार्ड आधार क्रमांक ४४६०३५२७४४२४, आधारकार्ड ४४६०३२७४४७४, आरिफ मलीक याचे इंडियन ओव्हरसिज बँकेचे पासबुक (अकाऊंट क्रमांक २२४९०१००००२२२०६), आरिफ मलीक याचे पॅनकार्ड (क्र. एफएक्सडीपीएम ८२८४एच), कोटक बँकेचे ए.टी.एम. कार्ड त्यावर इंग्रजीत रुबीना असे लिहिलेले आढळून आले.
दरम्यान, याबाबत ललीत रामाआप्पा गवळी (वय ३१, नेम. नंदुरबार शहर पोलीस ठाणे जि. नंदुरबार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरिफ मलीक याच्याविरुद्ध भा. न्या.सं. चे कलम ३३६ (३), ३३८, ३४० (२) प्रमाणे गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील करीत आहे.





