Friday, May 3, 2024
Homeनगरऊसाचे पाचरट दिले नाही म्हणून एकास मारहाण

ऊसाचे पाचरट दिले नाही म्हणून एकास मारहाण

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

ऊसाचे पाचरट देण्यास नकार दिल्याने दोघा जणांनी मिळून सोहेल शेख या तरुणावर तलवारी सारख्या हत्याराने वार करून त्याला जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील कनगर येथे घडली आहे.

- Advertisement -

सोहेल राजु शेख, वय 18 वर्षे, रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी. याने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले कि, सोहेल शेख हा त्याच्या कणगर गावाचे शिवारातील शेतमध्ये होता. शेतात ऊसाला तोड आल्याने, तो शेतात गेला होता. तेव्हा तेथे आरोपी बाळासाहेब जाधव व सतिश उर्फ करण जाधव हे दोघे तेथे आले. आणि सोहेल शेख याला म्हणाले की, आम्हाला ऊसाचे पाचट पाहिजे आहे.

तेव्हा सोहेल त्यांना म्हणाला की, ऊसाला पाणी कमी पडत असल्याने, आम्ही पाचरट कोणाला देणार नाही. असे म्हणालेचा त्यांना राग आला. त्यावेळी त्यांनी शिवीगाळ करुन तलवारी सारख्या हत्याराने वार केले. तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण करून तु आम्हाला पाचरट दिले नाहीतर तुला ऊस तोडू देणार नाही व तुमच्या शेतातील पिकाचे आम्ही नुकसान करुन टाकु. आमचे नादी लागलास तर तुला जिवंत सोडणार नाही अशी जिवे मारण्याची धमकी दिली.

सोहेल राजू शेख याच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी बाळासाहेब विलास जाधव व सतीश उर्फ करण विलास जाधव दोघे रा. कनगर तालुका राहुरी यांच्या विरोधात गुन्हा 1259/2022 भादंवि कलम 324, 323, 504, 506 तसेच आर्म क्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ज्ञानदेव गर्जे हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या