Thursday, May 14, 2026
Homeक्राईमCrime News: संतापजनक! कुरीअर बॉय बनून आला, तोंडावर स्प्रे मारला; बळजबरी घरात...

Crime News: संतापजनक! कुरीअर बॉय बनून आला, तोंडावर स्प्रे मारला; बळजबरी घरात घुसून २५ वर्षीय महिलेवर अत्याचार

पुणे | Pune
पुणे शहरातील कोंढवा परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीवर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात तरुणाने अत्याचार केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोपीने महिलेवर अत्याचार केल्यानंतर तिच्या सोबत सेल्फी काढल्याची माहिती समोर येत आहे. आरोपीने स्वत:ला कुरिअर बॉय असल्याचे सांगून सोसायटीमध्ये प्रवेश केला. दरवाज्यावर पोहोचल्यावर त्याने पीडित महिलेला बँकेच कुरिअर आहे असे सांगितले, त्यानंतर जबरदस्तीने घरात शिरून तिच्यावरती अत्याचार केला.

मिळालेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील एका गार्डेड सोसायटीमध्ये ही घटना घडली. आरोपीने स्वत:ला डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगत सोसायटीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दरवाज्यावर पोहोचल्यावर त्याने पीडित तरुणीला “कुरिअर आहे” असे सांगितले. तरुणीने “हे कुरिअर माझे नाही” असे स्पष्ट सांगून नकार दिला. मात्र आरोपीने “सही करावी लागेल” असा आग्रह धरला. त्यामुळे नाईलाजाने तिला सेफ्टी डोअर उघडावा लागला. त्याच क्षणी आरोपीने तिच्या तोंडावर केमिकल स्प्रे फवारला. यामुळे ती बेशुद्ध झाली. यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे घटनेनंतर आरोपीने अत्यंत निर्ढावलेपणाने पीडितेच्या मोबाईलमध्ये स्वतःचा सेल्फी काढला. तसेच ‘मी पुन्हा येईन’ असा मजकूर टाईप करून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

या घटनेप्रकरणी पोलिसांच्या १० पथके त्याचा तपास करत आहे. तरुणी आपल्या भावासोबत कोंढव्यात राहते. तरुणी मूळची अकोल्याची आहे. ती पुण्यातील कल्याणी नगरमधील कंपनीत काम करते अशी माहिती देखील पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे.

दरम्यान, ही घटना उच्चभ्रू व सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोसायटीत घडल्याने सुरक्षेचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. आरोपीने अतिशय हुशारीने कुरिअर बॉयचा गेटअप परिधान करुन सोसायटीत शिरला. सुरक्षारक्षकांकडून त्याची फारशी चौकशी झाली नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपीचे ओळख पटवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘गुप्तधना’च्या आमिषाने फसवणूक; भोंदूबाबा गजाआड

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील सर्जेपुरा परिसरात गुप्तधन मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका भोंदूबाबाने महिलेसह तिच्या कुटुंबाची 50 हजार रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...