Saturday, April 26, 2025
Homeनगरसमाजमाध्यमावर जातीवाचक संदेश; तिघांवर गुन्हा दाखल

समाजमाध्यमावर जातीवाचक संदेश; तिघांवर गुन्हा दाखल

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara

समाज माध्यमावर जातीवाचक संदेश टाकल्याप्रकरणी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिन सह अन्य दोघांवर अ‍ॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जातीयवाद्यांना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी देवळाली प्रवरा शहरात आरपीआयच्यावतीने कडकडीत बंद पाळण्यात आला.

- Advertisement -

राहुरी फॅक्टरी, देवळाली प्रवरा परिसरात सोशल मीडियावर असलेल्या सकल हिंदू समाज राहुरी फॅक्टरी – देवळाली प्रवरा या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर जातीवाचक संदेश टाकून समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे राहुरी पोलीस ठाण्यात सागर संसारे यांच्या फिर्यादीवरून डॉ. रवींद्र सुदाम भांड, अनिल पटारे, दत्तात्रय गागरे (ग्रुप अ‍ॅडमिन) या तिघांवर अ‍ॅट्रोसिटी कायदा अंतर्गत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ देवळाली प्रवरा शहरात आरपीआयच्यावतीने निषेध रॅली काढून देवळाली प्रवरा बंदचे आवाहन करण्यात आले. या आवाहनास प्रतिसाद देत शहरातील व्यापारी व दुकानदारांनी कडकडीत बंद पाळला. दुपारपर्यंत शहरातील व्यवहार पूर्णपणे ठप्प होते.

काल सकाळी देवळाली प्रवरा बाजारतळ येथे घटनेचा निषेध करून सोशल मीडियावर जातीयवादी संदेश टाकणार्‍या आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, रफिक शेख, कुमार भिंगारे, एकलव्य संघटनेचे गीताराम बर्डे, संतोष सरोदे, शोएब तांबोळी यांनी निषेधपर मनोगत व्यक्त केली. यावेळी राजू थोरात, माऊली भागवत, संजय संसारे, जनता ग्रुपचे पप्पू बर्डे, सोमनाथ भागवत, मनसेचे अनिल डोळस, विजय सरोदे, शंकर धोत्रे, लालू पंडित, अर्षद शेख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सांत्वन

0
पुणे । प्रतिनिधी Pune जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या पर्यटकांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...