Thursday, April 3, 2025
Homeक्राईमCrime News : नशेच्या गोळ्या व इंजेक्शन्सची विक्री करणारा तरुण गजाआड

Crime News : नशेच्या गोळ्या व इंजेक्शन्सची विक्री करणारा तरुण गजाआड

श्रीरामपूर शहर पोलिसांची सापळा रचून कारवाई || दोघांचा शोध सुरू

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

नशेच्या गोळया व इंजेक्शन्सची विक्री करणार्‍या तरुणाला श्रीरामपूर शहर पोलीसांनी अटक केली.त्यांच्याकडून नशेच्या गोळ्या व इंजेक्शनच्या औषधी बाटल्या तसेच 16 मोबाईल जप्त करण्यात आले. याबाबत अपर पोलीस अधीक्षक बसवराज शिवपुजे यांनी काल सायंकाळी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या प्रकरणी मतीन मेहबूब शेख (वय 19), रा. नेहरूनगर, वॉर्ड नं 1, श्रीरामपूर याला अटक केली असून त्याचा भाऊ अलेक्स उर्फ मुस्तकिम मेहबूब शेख व ख्वाजा पटेल यांचा पोलीस शोध घेत आहेत. काल निरीक्षक नितीन देशमुख यांना गोपनिय माहिती मिळाली की, मतीन शेख, श्रीरामपूर हा डावखर मळा, वॉर्ड नं 7 श्रीरामपूर परिसरात नशेच्या गोळया व इजेक्शन्सची विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्यावरुन पंचासह सापळा लावुन सदर इसमास ताब्यात घेवून अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात मेफेटरमीन इंजेक्शनच्या (टर्मिव्हीया) व नेफेटरमीन इंजेक्शनच्या नावाच्या गुंगीकारक व मानवी शरीराला अपायकारक असलेल्या बाटल्या मिळून आल्या.

- Advertisement -

संदर इन्जेक्शन विक्री करण्याचा त्याच्याकडे कुठलाही परवाना नसुन असे इंजेक्शन कुठल्याही वैद्यकीय अधिकार्‍याची पावतीही त्याच्याकडे मिळून आली नाही. त्यामुळे मतीन शेख याच्या विरुध्द तसेच सदर इंजेक्शन त्याला पुरविणारा त्याचा भाऊ अलेक्स उर्फ मुस्तकिम मेहबुब शेख व ख्वाजा पटेल यांच्याविरुध्द श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात बी.एन.एस. 2023 चे कलम 123, 925,210,278, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची पोलीस अधीक्षक कारवाई राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सपोनि गणेश जाधव, पोसई ठोंबरे, पोसई निकम तसेच पोको संपत बडे, अजित पटारे, पोको आंबादास आंधळे, संभाजी खरात, पोकॉ.अभंग, रवी शिंदे, सागर बनसोडे, अमोल पडोळेे, आजिनाथ आंधळे, धनंजय वाघमारे, अनिता गिते, श्री.सुन्तोडे बाळासाहेब गिरी यांनी केली आहे. पुढीलतपास सपोनि गणेश जाधव हे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पुन्हा एकदा गणवेश वितरणाची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यातील शासकिय शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या मोफत शालेय गणवेश वितरणाच्या निर्णयात सातत्याने बदल होत आहेत. मागील वर्षी तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी...