Friday, September 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCrime News : महिला पोलिसाचा विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

Crime News : महिला पोलिसाचा विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

अहिल्यानगर | प्रतिनिधी | Ahilyanagar

नगर शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस अंमलदाराने (Female Police Officer) विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रविवारी (८ जून) सकाळी सुमारे ११:३० वाजताच्या सुमारास घडली. जयश्री हरिश्चंद्र सुद्रिक (रा. कोपर्डी, ता. कर्जत) असे या महिला पोलीस अंमलदाराचे नाव आहे.

- Advertisement -

सुद्रिक यांनी वाहतूक शाखेत येण्यापूर्वीच विषारी औषध घेतल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. शहर वाहतूक शाखेत आल्यावर त्यांना त्रास जाणवू लागल्याने सहकाऱ्यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात (District Hospital) दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती पाहता त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेत आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे सुद्रिक यांच्या जवळून एक चिठ्ठी पोलिसांना सापडली असून त्यात एका सामाजिक संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्याने मानसिक त्रास दिल्याचे नमूद करण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. या त्रासाला कंटाळूनच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची शक्यता पोलिस (Police) तपासातून पुढे येत आहे.

दरम्यान, तोफखाना पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सदर चिठ्ठी ताब्यात घेतली असून, तिची सखोल तपासणी सुरू आहे. तसेच ही घटना समजताच पोलिस खात्यात वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दुष्काळाची चाहूल; ऑगस्टपाठोपाठ सप्टेंबरही कोरडा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्ह्यात ऑगस्टपाठोपाठ सप्टेंबर महिन्यातही पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिके होरपळून निघत असून राहुरी, श्रीरामपूर,...