Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCrime News : त्र्यंबकेश्वर मंदिरात सशुल्क दर्शन तिकिटांचा काळाबाजार; पोलिसांनी ठोकल्या पाच...

Crime News : त्र्यंबकेश्वर मंदिरात सशुल्क दर्शन तिकिटांचा काळाबाजार; पोलिसांनी ठोकल्या पाच जणांना बेड्या

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar

त्र्यंबकेश्वर देवस्थानची (Trimbakeshwar Temple) ऑनलाईन पास (Online Pass) सिस्टिम सदोष असल्याचे लक्षात घेत ऑनलाईन तिकिटे काढून त्या तिकिटांचा काळा बाजार करत महागड्या दराने बाहेरगावहून आलेल्या यात्रेकरू भाविकांना विकणाऱ्या टोळीला त्र्यंबकेश्वर पोलिसांनी (Trimbakeshwar Police) गजाआड केले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये दिलीप नाना झोले (रा. पेगलवाडी), सुदाम राजू बदादे (रा. पेगलवडी), समाधान झुंबर चोथे (रा.रोकडेवाडी), शिवाराज दिनकर आहेर (रा. त्र्यंबकेश्वर), मनोहर मोहन शेवरे (रा. रोकडेवाडी) यांचा समावेश आहे.

- Advertisement -

याबाबत त्र्यंबकेश्वर येथे पत्रकार परिषदेत घेत डीवायएसपी वासुदेव देसले (Vasudeo Bhosale) यांनी माहिती देताना सांगितले की, संशयितांनी १६४८ पास काढून आतापर्यंत पाच हजार भाविकांना तिकीट सातशे ते हजार रुपये अशा चढ्या भावाने विकल्याचे दिसून आले आहे. गत सहा महिन्यांत हे बनावट पास विकले गेले. एका पासवर तीन चार जणांची नावे घेत तिकीट काढले जात होते. संशयित स्वतःच्या खासगी मोबाईलमध्ये (Mobile) डायरेक्ट खटल ग्रुप काढून त्याद्वारे ऑनलाईन तिकिटांची त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात विक्री करत, असे पोलिसांनी सांगितले.

YouTube video player

पेड दर्शन सुविधेत भाविकांना (Devotees) ऑनलाईन तिकिटे मिळत नाहीत तसेच तिकीट मंदिर परिसरात २०० रुपयांऐवजी ७०० ते १००० रुपयांना भाविकांना विक्री केली जात असल्याची चर्चा झाल्यानंतर देवस्थान ट्रस्टने याबाबत पोलिसांना पत्र पाठवून होत असलेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्याचे आवाहन केले होते. देवस्थान ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साळी यांच्या पत्राची पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी गंभीर दखल घेऊन त्र्यंबकेश्वर पोलिसांना तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे याचा शोध पोलीस उपविभागीय अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला. पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी व सहकारी यांनी तपास केला. ऑनलाईन पाच हजार तिकिटे काढले जातात तर ऑफलाईन दोन हजार तिकिटे काढली जातात. असा सात हजार तिकिटांचा (Tickets) कोटा मंदिर ट्रस्टचा आहे. ऑफलाईन पद्धतीने ही तिकिटे काढलेली नव्हती तर ऑनलाईन पद्धतीने (उणीव शोधत) ही तिकिटे काढलेली होती. बनावट नावे व पत्ता, बनावट ओळखपत्र क्रमांक, नंबर वापरून ही तिकिटे आरोपी मोबाईलद्वारे तयार करत होते.

दरम्यान, मुख्य आरोपीने पोलिसांना पत्रकारांसमोर मोबाईलवर बनावट पास काढण्याचे प्रात्यक्षिक अवघ्या तीन मिनिटांत करून दाखवले. आरोपी खूप शिकलेले नसताना त्यांनी मोबाईलचा वापर केला. संशयित पाच आरोपी हे युवक असून त्र्यंबक परिसरातील आहेत. गर्दीमध्ये ज्यांना तिकीट काढण्यास वेळ नाही असे लोक अथवा गरजू भाविक शोधून त्यांना ही तिकिटे विकली जात होती. २०० रुपयांचे एक तिकीट हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीत विक्री करत होते.

पोलिसांची देवस्थानला सूचना

पेड दर्शनासाठी तिकिटे ऑफलाईन आणि ऑनलाईन वितरण करताना यंत्रणेतील त्रुटी शोधून त्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने दूर कराव्यात, अशी सूचना ट्रस्ट मंडळाला पोलिसांनी केली आहे.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’ आजपासून

0
नाशिक | प्रतिनिधी Nashikदैनिक 'देशदूत' आयोजित गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६फला आजपासून (दि.२३) मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेअभिनेते मिलिंद गुणाजी...