Monday, May 20, 2024
Homeदेश विदेशCrime News : जोधपूर हादरलं! ६ महिन्यांच्या चिमुकल्यासह चौघांना संपवलं अन् अंगणात...

Crime News : जोधपूर हादरलं! ६ महिन्यांच्या चिमुकल्यासह चौघांना संपवलं अन् अंगणात फरफटत आणून पेटवलं

जोधपूर | Jodhpur

राजस्थानच्या जोधपूर परिसरात बुधवारी सकाळी खळबळजनक हत्याकांड समोर आले. एकाच कुटुंबातील ४ लोकांची निर्दयी हत्या करण्यात आली. या घटनेत ६ महिन्याच्या चिमुरडीलाही गुन्हेगारांनी सोडले नाही. कुटुंबातील प्रमुख व्यक्ती, त्याची पत्नी, सून आणि नाती यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. इतक्यावर गुन्हेगार थांबले नाही तर त्यांनी सर्व मृतदेह फरफटत अंगणात आणण्यात आले. त्यानंतर ते पेटवून देण्यात आले.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूरच्या चेराई गावात ही घटना घडली आहे. येथे रात्री एक कुटुंब घरात झोपलेलं होतं. यावेळी आरोपी घऱात घुसले आणि चारही जणांची हत्या केली. मृतांमध्ये सहा महिन्याच्या मुलीचाही समावेश आहे. हत्या केल्यानंतर आरोपी मृतदेह खेचत अंगणात घेऊन आले आणि आग लावली. सकाळी नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरु केला आहे.

Video : नगरमधील ‘मर्डर’ विधीमंडळात गाजला

गावकऱ्यांना सकाळी पीडित कुटुंबाच्या घरातून धूर येताना दिसला. ग्रामस्थांनी जाऊन पाहिलं असता सगळेच हादरले. अंगणात चार जळलेले मृतदेह पडलेले होते. यामध्ये सहा महिन्याच्या मुलीचाही मृतदेह होता, जो जवळपास पूर्ण जळाला होता. तर इतर मृतदेह अर्धवट जळाले होते. पोलीस दाखल झाल्यानंतर फॉरेन्सिक टीमलाही बोलावण्यात आलं. फॉरेन्सिक एक्स्पर्ट घटनास्थळावरुन पुरावे गोळा करत आहेत. मृत कुटुंब शेतीचं काम करत होतं अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. दरम्यान ही हत्या कोणी आणि कशासाठी केली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. आरोपी कुठून आले होते, किती होती आणि कोणत्या शस्त्राने हत्या केली याची माहिती पोलीस घेत आहेत. पोलीस सध्या सर्व बाजूंनी तपास करत आहेत. तसंच ग्रामस्थांची चौकशी केली जात आहे.

भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने टॅक्सीला उडवलं, ६ जणांचा जागीच मृत्यू… घटना CCTVत कैद

- Advertisment -

ताज्या बातम्या