Thursday, May 23, 2024
Homeनगरखळबळजनक! संगमनेर जेलमधून गंभीर गुन्ह्यातील चार कैदी पळाले, शोधमोहीम सुरू

खळबळजनक! संगमनेर जेलमधून गंभीर गुन्ह्यातील चार कैदी पळाले, शोधमोहीम सुरू

संगमनेर (शहर प्रतिनिधी)

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या शेजारीच असणाऱ्या जेलमधील चार आरोपींनी जेलचे गज तोडून पलायन केल्याची घटना पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. ‌जेलमधील कैदी पळून गेल्याने पोलिसांची पळापळ झाली आहे. या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना झाले आहेत. कारागृहातून कैदी पळाल्याने संगमनेर जेल प्रशासनाची इज्जत पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

- Advertisement -

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या शेजारीच उपकारागृह बांधण्यात आलेले आहे. या कारागृहामध्ये तीन बराकी आहेत. या जेलमध्ये २४ कैद्यांची क्षमता असतानाही अनेकदा क्षमतेपेक्षा जास्त कैदी या जेलमध्ये ठेवलेले असतात. या कारागृहामध्ये कैद्यांना गुटखा, तंबाखू, बाहेरचे जेवण, मोबाईल आधी सुविधा सहज उपलब्ध होत असल्याने संगमनेरचे कारागृह नेहमी चर्चेचा विषय असते. जेलच्या बंदोबस्तावर असणारे पोलीस व कैदी यांच्यात होणारे वाद विवाद यामुळे हे कारागृह वादग्रस्त ठरले आहे.

संगमनेच्या कारागृह सध्या अनेक कैदी शिक्षा भोगत आहे. काल रात्री नेहमीप्रमाणे तीन पोलीस कर्मचारी बंदोबस्तास होते. हे कर्मचारी बंदोबस्तात असतानाही कैदी जेलचे गज कापून पळून जाण्यासाठी ठरले. या जेलमध्ये शिक्षा भोगत असलेले राहुल काळे, मच्छिंद्र जाधव, रोशन थापा ददेल, अनिल काळे हे आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने या आरोपींनी जेलमधून पळ काढला. बंदोबस्तावरील पोलिसांचे दुर्लक्ष व्हावे यासाठी जेलमध्ये मोठ मोठ्याने गाणे आरत्या सुरू होत्या. या गोंधळात या चौघांनी जेलचे गज तोडले. ठरल्याप्रमाणे बाहेर एक कार अगोदरच येऊन थांबलेली होती. जेल तोडून हे कैदी या कार मध्ये बसून पसार झाले.

जेलमधून कैदी पळून गेले असल्याचे पोलिसांना समजतात त्यांची धांदल उडाली.तिघेजण जेलच्या बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले होते. जेलमधून कैदी पळून गेल्याची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. यानंतर अधिकाऱ्यांनी त्वरित पोलीस पथके तयार करून नाशिक व इतर ३ ठिकाणी पाठवले. पळून गेलेले आरोपी हे गंभीर गुन्ह्यातील असल्याने त्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहेत.

दरम्यान जेलमधील आरोपी पळून गेल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जेलमधील आरोपींकडे अँड्रॉइड मोबाईल होता अशी माहिती उपलब्ध झाली. हा मोबाईल त्यांना कोणी पुरवला त्यांना घेऊन जाणारे वाहन कोणाचे होते. ज्याच्या बंदोबस्ताला तीन पोलीस असतानाही हे आरोपी पळून कसे गेले याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलीस निरीक्षकांचा रात्र पाळीचा बंदोबस्त असतानाही आरोपी पळाल्याने आश्चर्य

संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे काल रात्रपाळीच्या बंदोबस्तावर होते. तुरुंगाची तपासणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. खुद्द पोलीस निरीक्षक बंदोबस्त असतानाही जेल मधील आरोपी पळून गेले आहेत. यामुळे या घटनेला जबाबदार पोलीस निरीक्षक असल्याचे मानले जात आहे. यामुळे पोलीस निरीक्षकांची चौकशी होण्याची शक्यता आहे. ‌जिल्हा पोलीस अधीक्षक कोणती भूमिका घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या