Monday, March 31, 2025
Homeनगरदारूसाठी पैसे न दिल्याने एकास गावठी कट्टा लावून जिवे मारण्याची धमकी

दारूसाठी पैसे न दिल्याने एकास गावठी कट्टा लावून जिवे मारण्याची धमकी

गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi

नेवासा (Newasa) तालुक्यातील घोडेगाव (Ghodegav) येथील घोडेगाव सोनई चौक येथे मंगळवार (14 नोव्हेंबर) रोजी दुपारी 2.30.च्या सुमारास दारूसाठी पैसे न दिल्याने एकास गावठी कट्टा (Gavathi Katta) लावून जिवे मारण्याची धमकी (Threat) दिली आहे.

- Advertisement -

एक कोटीची लाच प्रकरण: अखेर अभियंता वाघ गजाआड

सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी रामदास जाधव घरी असतांना आरोपीत निलेश मधुकर केदारी (रा. घोडेगाव) हा विनानंबरची स्प्लेंडर मोटारसायकलवर घरासमोर आला व फिर्यादीस दारु पिण्यासाठी पैशाची मागणी करु लागला. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता आरोपी केदारी याने फिर्यादीस शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या दुचाकीला (Bike) आरोपीने त्याच्या दुचाकीने धडक दिली. तेव्हा दोघेही खाली पडल्याने किरकोळ दुखापत झाली.

श्रीगोंद्यात कोयते घेऊन तरुणांची दहशत

आरोपीने उठुन फिर्यादीस तुझ्यामुळे मला लागले आहे असे म्हणुन फिर्यादीस मारहाण (Beating) करत खिशातील 5200 रुपये बळजबरीने काढून घेतले. तसेच आरोपीने गावठी कट्टा (Gavathi Katta)काढून फिर्यादीस जिवे मारण्याची धमकी (Threat) दिली. या प्रकरणी 494/2023 भा.द.वि.327, 323, 504, 506 आर्म अ‍ॅक्ट 3/25 नुसार सोनई पोलीस ठाण्यात (Sonai Police Station) गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. पुढील तपास प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस. हे. कॉ.एम.आर.आडकित्ते हे करत आहेत.

357 गावांत दूषित पाणी

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : महिलेवर कोठला परिसरात टोळक्याचा हल्ला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील कोठला, घासगल्ली येथे राहणार्‍या एका महिलेला मारहाण केल्याची घटना शनिवारी (29 मार्च) सायंकाळी घडली. गौसीया शेरू शेख (वय 24) असे मारहाण...