Wednesday, April 9, 2025
HomeनगरCrime News : नेवासा तालुक्यातील बालिकेशी अश्लिल चाळे

Crime News : नेवासा तालुक्यातील बालिकेशी अश्लिल चाळे

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नऊ वर्षीय मुलीसोबत एका व्यक्तीने अहिल्यानगर शहरातील एका रुग्णालय परिसरात अश्लिल चाळे केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (7 एप्रिल) रात्री 8.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात बालकांवर लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

किरण उत्तम काळे (रा. सिटीशन कॉलनी, आलमगीर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. फिर्यादी नेवासा तालुक्यातील एका गावात राहतात. त्या आपल्या कुटुंबियांसह अहिल्यानगर शहरातील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आईची भेट घेण्यासाठी आलेल्या होत्या. रुग्णालयाच्या कंपाउंडमध्ये ते सर्वजण मोकळ्या जागेत बसलेले असताना, त्यांची मोठी मुलगी रडत रडत त्यांच्याकडे आली. विश्वासात घेतल्यानंतर तिने सांगितले की, बाथरूमला जात असताना एका अनोळखी इसमाने तिच्याशी अश्लिल चाळे केले. याआधी ती खेळत असताना देखील तिच्याशी चाळे केले. घटनेने हादरलेल्या कुटुंबियांनी रुग्णालयात त्या इसमाचा शोध घेतला.

थोड्याच वेळात तो इसम आढळून आला असता, पीडित मुलगी त्याला पाहून मोठमोठ्याने रडू लागली. त्यानंतर कुटुंबियांनी संबंधित इसमास पकडून त्यास जाब विचारला असता, त्याने उलट हुज्जत घालत झटापट करण्याचा प्रयत्न केला. चौकशीअंती त्या व्यक्तीचे नाव किरण उत्तम काळे असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, पीडित मुलीच्या कुटुंबियांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. कोतवाली पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मुळा पाटबंधारे विभागाचा ‘हम करे सो कायदा’

0
शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav गेल्या महिनाभरापासून मुळा धरणातून असलेले रब्बी आवर्तन बंद होण्याची वेळ आली असताना अद्यापही शेवगाव तालुक्याच्या पश्चिम भागांमधील अनेक गावांना पाणी मिळालेले...