Wednesday, April 2, 2025
Homeक्राईमCrime News : बेकायदेशीर हुक्का पार्लरवर छापा

Crime News : बेकायदेशीर हुक्का पार्लरवर छापा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तोफखाना पोलिसांनी सावेडी उपनगरातील सोनानगर चौकातील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर हुक्का पार्लरवर छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत विविध हुक्का सामग्रीसह एक युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. आयुष भिम भटराय (वय 18, रा. वाघ गल्ली, नालेगाव) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्याकडून एक हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सोनानगर चौकात ब्रोकोड नावाचे हुक्का पार्लर बेकायदेशीररीत्या चालवले जात आहे.

- Advertisement -

या माहितीच्या आधारे त्यांनी तत्काळ कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दोन पंच व पोलीस अंमलदारांना सोबत घेत सदर ठिकाणी छापा टाकला. दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच काही इसम पाठीमागील दरवाजाने पसार झाले. मात्र, एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव आयुष भिम भटराय असे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडे हुक्का पार्लर चालविण्याचा कोणताही परवाना आहे का, याची विचारणा केली असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पाटील, अंमलदार अनिल चव्हाण, सुरज वाबळे, महेश पाखरे यांच्या पथकाने केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नगर शहरात डॉ. आंबेडकर यांचा 28 फुटी पूर्णाकृती पुतळा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात असलेल्या संविधानकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासारखाच पूर्णाकृती पुतळा अहिल्यानगर शहरात उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात...