Thursday, January 8, 2026
Homeनगरसाईंच्या शिर्डीतही कोयता गँगची दहशत! मध्यरात्रीच्या सुमारास तरुणाला लुटले, थरार CCTVमध्ये कैद

साईंच्या शिर्डीतही कोयता गँगची दहशत! मध्यरात्रीच्या सुमारास तरुणाला लुटले, थरार CCTVमध्ये कैद

शिर्डी । Shirdi

एकीकडे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कोयता गँग (Koyata ganf) धुमाकूळ घालत असताना दुसरीकडे साईंच्या शिर्डीतही (Shirdi) कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली आहे.

- Advertisement -

कामावरून घरी परतणाऱ्या तरुणाला कोयता गँगच्या गुंडांनी लुटल्याचा धक्कादायक प्रकार शिर्डीतून समोर आला असून लुटमारीचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

YouTube video player

मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीतील एका हॉटेलमध्ये कुक असणारा तरुण मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास कामावरून घरी येत होता. या तरुणाला वाटेतच अज्ञात आरोपींने अडवले.

कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडून पैसे तसेच मोबाइल लुटून आरोपी फरार झाले. ही संपूर्ण घटना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

शिर्डीत होत असलेल्या या गंभीर प्रकारामुळे लोक रात्रीचे घराबाहेर पडायला घाबरत असून भाविकांमध्ये सुद्धा घबराटीचे वातावरण बघावयास मिळत आहे. यावर वेळीच टाच बसली नाही तर जिल्ह्यातील सर्वात मोठे गुन्हेगारीचे शहर म्हणून शिर्डीच्या नावाची ओळख होऊ शकते हे नाकारून चालणार नाही.

ताज्या बातम्या

टॅरिफ

रशियावर ५०० टक्के टॅरिफ लादणाऱ्या विधेयकाला अमेरिकेत मंजुरी; भारतावरही ‘इतके’ टक्के...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियावर ५०० टक्के आयातशुल्क (टॅरिफ) लादण्याच्या तयारीत आहेत. या संदर्भातील विधेयक पुढील आठवड्यात संमत होण्याची...