Friday, April 25, 2025
Homeनगररांजणी येथे घर बांधकाम मजुराचा खंडणीसाठी कुर्‍हाडीने खून

रांजणी येथे घर बांधकाम मजुराचा खंडणीसाठी कुर्‍हाडीने खून

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)- तालुक्यातील रांजणी येथे नवनाथ मारुती घोडके यांच्या घराचे बांधकाम करणार्‍या नगर तालुक्यातील खोसपुरी येथील साहिल पठाण या मजुराचा गावातील गावगुंडानी हप्ता न दिल्याच्या रागातून कुर्‍हाडीने डोक्यात गंभीर वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की मुबारक अब्दुल पठाण (रा. खोसपुरी, ता. नगर) यांनी पाथर्डी तालुक्यातील रांजणी येथील नवनाथ मारुती घोडके यांच्या घराचे बांधकाम करण्याचा ठेका घेतलेला होता.  या कामावर 10 दिवसापासून इरफान हसन पठाण, रसूल बेग, युनूस पठाण, साहिल पठाण (रा खोसपुरी ता. नगर) हे मजुरीने बांधकाम करत होते. मंगळवारी सकाळी बांधकामाची वाळू चाळण्यास सुरवात केली.

- Advertisement -

असता दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान वाळू चाळत असलेल्या ठिकाणी गावातील आरोपी बुट्ट्या पवार व साहेबराव पवार तसेच ईतर दोन अज्ञात आरोपींनी साहिल पठाण यास बाहेरील मजुरांना या गावात आम्हाला हप्ते द्यावे लागतात असे सांगितले त्यामुळे बांधकाम सुरू असलेल्या घराचे मालक घोडके यांच्या मध्यस्थीने आरोपींना समजावून सांगितले असता त्यांनी रागाने साहिल यास खंडोबा मंदिर जवळच्या बोळीत नेहले व आरोपी बुट्ट्या पवार व साहेबराव पवार तसेच ईतर दोन अज्ञात आरोपींनी साहिल पठाण यांच्या डोक्यात कानाजवळ कुर्‍हाडीने वार करून गंभीर दुखापत केली त्यामुळे साहिल यास तात्काळ पाथर्डी व नंतर नगर येथे खाजगी दवाखान्यात हलवले परंतु गंभीर दुखापत असल्याने रक्तस्त्राव होवून साहिल याचा मृत्यू झाला.

रात्री उशिरा आरोपी बुट्ट्या पवार व साहेबराव पवार तसेच ईतर दोन अज्ञात आरोपीं विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर जावळे हे करत आहेत. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...