Friday, September 20, 2024
Homeक्राईममुलगी देण्यास नकार दिल्याने वडिलांचा केला खून

मुलगी देण्यास नकार दिल्याने वडिलांचा केला खून

उत्तर प्रदेशातून मौलानासह दोघांना पोलिसांनी केली अटक

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

लग्नासाठी मौलानाने मुलीला मागणी घातली, परंतु मुलीच्या वडिलांसह नातेवाईकांनी नकार दिल्याने चिडलेल्या मौलानाने साथीदारांच्या मतदीने पूर्वनियोजित कट रचून वडिलांचा गळा आवळत खून (Murder) केल्याचे अखेर उघड झाले. संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुन्ह्याची उकल करत थेट उत्तर प्रदेशमधून मौलानासह दोघांच्या मुसक्या आवळत गजाआड केले.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी (Sangamner City Police) दिलेली अधिक माहिती अशी, की उत्तर प्रदेशातील मौलाना मोहम्मद जाहीद मोहम्मद यूनुस मुलतानी (रा. साहरनपूर, उत्तर प्रदेश) हा नेहमी संगमनेरातील आहतेशाम इलियास अन्सारी (रा. मदिनानगर, संगमनेर) यांच्या घरी यायचा. त्यामुळे अन्सारी कुटुंबियांचा मौलानावर विश्वास बसला होता. त्याने कालांतराने अन्सारी यांच्या मुलीला लग्नाची मागणी घातली. परंतु, मौलाना असल्याने काम करण्यासाठी बाहेर फिरत असल्याने त्यास वडीलांसह नातेवाईकांनी नकार दिला. याचा राग आल्याने मौलाना मुलतानी याने मुलीचे वडील अन्सारी यांना दमदाटी करुन ‘तुमने ऐसे तरीके से लडकी नही दी तो मुझे दुसरा तरीका भी आता है, मै तुमको बरबाद कर डालूगाँ’ अशी धमकी (Threat) दिली. त्यानंतर साथीदार मोहम्मद इम्रान निसार सिद्दीकी (रा. कल्याण) व मोहम्मद फैजान शमीम अन्सारी (रा. बगदादा, ता. धामपूर, जि. बिजनौर) यांच्या मदतीने पूर्वनियोजित कट रचला.

त्यानुसार 3 एप्रिल, 2024 रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास मालदाड गावच्या पुढील वनामध्ये दोरीच्या साहाय्याने गळा आवळून खून केला. तेथून पुरावा नष्ट व्हावा म्हणून मयताचा मोबाइल फोन घेऊन गेले. याप्रकरणी सुरुवातीला शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी सखोल तपासाच्या सूचना दिल्या असत्या खून झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी थेट उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) मौलानासह वरील दोघा साथीदारांच्या मुसक्या आवळत मयताचा मुलगा जुनेद आहतेशाम अन्सारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल (Filed a Case) करुन गजाआड केले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या