Saturday, May 25, 2024
Homeनगरमटणाचे दुकान चालवायाचे तर पाच हजार दे !

मटणाचे दुकान चालवायाचे तर पाच हजार दे !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मटणाचे दुकान (Mutton Shop) चालविण्यासाठी दर महिन्यांला पाच हजार दे, (Demand Money) अन्यथा दुकान चालून देणार नाही, असे म्हणत सागर गायकवाड, त्याचा भाऊ आणि वडिल आणि चुलते यांनी निंबळक (Nimbalak) गावाच्या शिवारात निंबळक रोडवर (Nimbalak Road) साहिल शेखवर खुनी हल्ला केला. याप्रकणी शेख याच्या फिर्यादीवरून सागर गायकवाड अन्य दोघे यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न असा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल (MIDC Police Station) झाला आहे.

- Advertisement -

याबाबत दाखल फिर्यादीत शेख यांने म्हटले की, त्याचे निंबळक (Nimbalak) गावाच्या शिवारात हॉटेल सावलीजवळ अल्ताब मटण शॉप नावाचे दुकान आहे. त्या ठिकाणी मंगळवार (दि.24) रोजी दुपारी चारच्या सुमारास सागर गायकवाड (पूर्ण नाव माहिती नाही), त्याचा सख्खा भाऊ (नाव माहित नाही), सागरचे वडील (नाव माहित नाही) आणि सागरचे चुलते (नाव माहित नाही) हे आले. त्यांनी शेख याला 3 तीन किलो बोकडाचे मटण (Mutton)मागितले. त्यानंतर शेख याने तीन किलो मटण (Mutton) तोडून दिले.

त्यानंतर आरोपींनी शेख याच्याकडे पाच हजारांची मागणी Demand Money) केली. तसेच पाच हजार रुपये न दिल्यास दुकान चालवून न देण्याचा इशारा (Hint) दिला. त्याय शेख याने नकार दिल्याने आरोपीनी शेख याला कुर्‍हाडीने डोक्यावर, तोंडावर, हाताावर, छातीवर मारहाण (Beating) केली. तसेच शेख याच्या चुलत भावाच्या गळाला सत्तूर लावला.

यावेळी झालेल्या मारहाणीत (Beating) शेख यांच्या ओठाला जखमी (Injured) झाली असून दोन दातही पडलेले आहेत. तसेच हाताला खरचटले असून मुक्कामारही लागलेला आहे. यावेळी फिर्यादीचे चुलते शेख अल्ताब महम्मद यांनी फिर्यादीला सोडवून आधी जिल्हा रुग्णालय आणि त्यानंतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याचे फिर्यादीत म्हटलेले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) खुनाचा प्रयत्न (Murder Try) करणे हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक पाठक पुढील तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या